हैद्राबाद गॅझेटीयर नाकारले असेल तर 18 ऑक्टोबर रोजी मराठा याचिकावर सुनावणी कशासाठी...?

हैद्राबाद गॅझेटीयर नाकारले असेल तर 18 ऑक्टोबर 2025 रोजी मराठा याचिकावर सुनावणी कशा साठी... ?
मुंबई, दि.10(डि-24 न्यूज)- सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित आदेशा विरुद्ध अनेक मान्यवर न्यायालयात जातील हे गृहीत धरून आम्ही सर्वोच्च न्यायालय विविध उच्च न्यायालयात कॅव्हेट पिटीशन दाखल केलेल्या असल्यामुळे मराठा आरक्षण विरोधकांच्या एक तर्फी मागणी वर एकतर्फी निर्णय घेता येणार नाही. वास्तविक पहाता सरकारने नवीन काही दिले नाही सर्व काही जुनेच आहे त्यासाठी निर्णय अभ्यासपूर्वक वाचने गरजेचे आहे. गॅजेट मध्ये नावे नसून लोकांची संख्या नोंदी असलेली आकडेवारी आहे आणि आकडेवारी नुसार सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही.
माधुरी पाटील प्रकरणातील घटनापीठाच्या निर्णयास दुर्लक्षित करता येणार काय... ?
आणि पुढे जात पडताळणी वेळेस माधुरी पाटील या केस मधील सर्वोच्च न्यायालयात घटनापीठाने दिलेले निर्णय अंमलबजावणी केल्या शिवाय जात पडताळणी कशी करणार ? हे सुद्धा सर्वश्रुत असुन हे मराठा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना ज्ञात असणे गरजेचे आहे..
ओबीसी संघटनाने,कोणी रीट पिटीशन दाखल केली तरी सर्वोच्च न्यायालय दिल्ली नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयात आम्ही एकाच वेळी कॅव्हेट पिटीशन दाखल केली असल्या मुळे कोणीही कितीही संघटना कोर्टात जाऊ द्या त्यांचा बंदोबस्त अगोदरच आम्ही केलेला आहे.
हैद्राबाद गॅझेटीयर नाकारले असेल तर... ?
याचिकावर 18 ऑक्टोबर 2025 रोजी याच याचिकावर सुनावणी कशासाठी आहे... ? अशी सर्व साधारण भावना असुन मुंबई येथील उच्च न्यायालयात दिवाणी अपील अधिकार क्षेत्र 2025 चा लेखी याचिका क्रमांक 12228 वर्ष 2025 चा लेखी याचिका 2025 चा लेखी याचिका वर्ष 2025 चा विविध लेखी याचिका क्रमांक असुन याचिका कर्त्या संघटना घटना, कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकर समाज संस्था, सदानंद बापू मंडलिक, महाराष्ट्र नाभीक महामंडळ विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर असे असुन यासह 2025 च्या लेखी याचिकाचा अंतरिम अर्ज व लेखी याचिका, अंतरिम अर्ज विविध याचिका मध्ये अनेक मान्यवर वकील मंडळी ज्यात अनिल व्ही.अंतुरकर, वरिष्ठ वकील, सुदर्शन खवसे, रीट याचिका मध्ये याचिका कर्त्याचे वकील श्रीयश ललित याचिकाकर्त्याचे वकील वेंकटेश धोंड, वरिष्ठ वकील, रोहन केळकर, 2025-ग्रुप मॅटर असे असुन हर्ष निशार व कु.नियती सोनटक्के वकील याचिका कर्ता अखिलेश दुबे, वर्गीस मिश्रा, अमित दुबे, उत्तम दुबे, वरद दुबे, अभिषेक कर्णिक, राजुराम कुलेरिया, शुभम शर्मा, इमाद खान, ॲलेक्स डिसोझा, साहिल उपाध्याय आणि शिवम मिश्रा मध्ये याचिका कर्त्या साठी वकील, कायदा समुपदेशकां द्वारे रीट याचिका माधवी अय्यपन आणि सत्यजीत यांच्या सोबत सतीश तळेकर आणि असोसिएट्स, याचिका कर्त्या साठी रीट याचिका स्टँप मध्ये महेश देशमुख (व्ही.सी. द्वारे) के.डी. पोटे यांच्या सोबत, विविध याचिका मध्ये रवी कदम, वरिष्ठ वकील सूरज अय्यर, सुश्री कनक यांच्या सोबत नालिक, सुश्री गौरी जोशी त्यांचे गणेश अँड कंपनी, रीट याचिका/ आय ए एस टी मधील अर्जदार- मध्यस्थांचे वकील, राज्य शासनाचे वकील डॉ.बिरेंद्र बी.सराफ, महाधिवक्ता, सुश्री नेहा एस. भिडे यांच्या सोबत सरकारी वकील ओ.ए. चांदुरकर, अतिरिक्त सरकारी वकील, जय संकलेचा, सहाय्यक सरकार वादी आणि जी.आर. रघुवंशी, सहाय्यक सरकार प्रतिवादी-महाराष्ट्र राज्याचे वादी असे सर्व मान्यवर जण म्हणुन कोणत्या प्रकरणात सुनावणी साठी उपस्थित राहणार असुन जर हैदराबाद गॅझेटियर नाकारले असेल तर दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी कुठली सुनावणी आहे ? हा निकाल देते वेळी चंद्रशेखर, मुख्य न्यायाधीश आणि गौतम ए. अखंड असे होते दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी यावर निकाल आला असुन याला (हायब्रिड सुनावणी द्वारे ) यात सांगितले की, विविध रिट याचिका क्रमांक मध्ये काही किरकोळ सुधारणा करायच्या आहेत असे सांगून, याचिका कर्त्याचे वेंकटेश धोंड, माळी समाज महासंघ दिवसा दरम्यान अशा दुरुस्ती करण्याची परवानगी मागतो तर मसुदा दुरुस्तीची प्रत न्यायालयात सादर केली गेली असुन त्याच्या प्रती प्रतिवादींसाठी उपस्थित असलेल्या सहाय्यक वकिलांना पुरवल्या गेल्या असुन मसुदा दुरुस्तीच्या अटींनुसार 2025 च्या रिटयाचिका मध्ये सुधारणा करण्याची परवानगी देण्यात आली असुन याचिका कर्त्याला या रिट याचिकेत केलेल्या प्रार्थनांवर विचार करण्याचे स्वातंत्र्य असेल आणि आवश्यक असल्यास, त्यात सुधारणा करण्याचे स्वातंत्र्य असेल असे म्हटले असुन 2025 च्या एका रिट याचिका मध्ये, परिच्छेद क्रमांक 2,9 आणि 27 मध्ये सुधारणा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 2025 च्या अंतरिम अर्ज म्हणून क्रमांकित अंतरिम अर्जाची प्रत न्यायालयात सादर केली असुन त्याची प्रत सहाय्यक वकिलाना तसेच अॅडव्होकेट जनरल यांना पुरवली गेली असुन, दुरुस्तीची मागणी करणारा अंतरिम अर्ज म्हणजेच 2025 चा अंतरिम अर्ज ओळखण्या साठी "एक्स" म्हणून चिन्हांकित केला आहे आणि दुरुस्ती अनुसूची मध्ये रिट याचिकेत दुरुस्तीची मागणी असेल तोपर्यंत तो परवानगी आहे पुढे दुरुस्ती अनुसूची रिट याचिकेत योग्य ठिकाणी ठेवावी आणि ती पुढील तारखेच्या दिवसाच्या दरम्यान केली जाईल असे नमुद असुनया बाबी 7 ऑक्टोबर 2025 रोजी 2025 च्या अंतरिम अर्ज (स्टॅम्प) च्या रिट याचिका दोन रिट याचिका (स्टॅम्प) सोबत 7 ऑक्टोबर 2025 च्या सुनावणी साठी ठेवावी असे सुद्धा न्यायमूर्ती गौतम ए.अखंड व मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी नमुद केले होते ते का केले असेल ? याचा विचार समाज बांधव करणार आहे की नाही ?कारण अद्याप हैदराबाद गॅझेटियर विषयावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसुन त्यावर पुढील सुनावणी 18 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. मराठवाड्यातील नोंद उपलब्ध असलेल्या व्यक्तींनी विहित पद्धतीचा शासकीय अवलंब केल्यास कुणबी जात प्रमाणपत्र मिळणारच आहे.
ज्यांच्या कडे काही एक पुरावा नाही त्या सर्व " मराठा " बांधवांचे काय ?
त्यानुसार सर्वपक्षीय सरकारने मराठा समाजाला एस.इ.बी.सी आरक्षण दिलं होतं आणि ते अजून टिकून आहे. नोंदी शोधण्याचे कार्य सुरू झाले आणि नोंदी शोधून, ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना जात प्रमाणपत्र देण्यास कोणी ही रोखू शकत नाही. परंतु " ज्यांच्या कडे काही एक पुरावा नाही त्या सर्व " मराठा " बांधवांचे काय ?" हा प्रश्न मात्र अनुत्तरित ठेवला जात आहे. त्यामुळे प्रसिद्धी पासुन सातत्याने दुर असलेल्या संपुर्ण जीवन मराठा आरक्षण मिळवण्यासाठी बहाल केलेले समाज सेवक विविध न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर सेवा प्रदान करीत असुन न्यायालयीन कामकाजावर त्या अर्जदाराचे सुद्धा बारकाईने लक्ष आहे.
समस्त मराठा समाजास नम्र आवाहन...
असुन असेच लक्ष मराठा समाज बांधवांनी सुद्धा ठेवावे असे आवाहन राज्यभरा मधून रामचंद्र शेडगे सातारा मुंबई, संतोष दळवी मावळ पुणे, सुभाष देसाई कोल्हापूर, कृष्णत नलावडे माण सातारा, दत्ता शेळके, व्यासदेव पवार, प्रकाश भाऊ जगताप फलटण, श्रीपाद सपकाळ सातारा, गोपाळ चोपडे बुलढाणा, शिवाजी उगले जालना, नाना भिंताडे, पोपट भिलारे, संदीप ऐजरे, कृष्णाजी नलवडे, संतोष चव्हाण पुणे, कैलासराव पाटील मुंबई, आनंदराव भोसले कोल्हापूर, मधुकर कोडक मुंबई, अशोक शिंदे अहिल्यानगर, जितेंद्रभाई रांजने, जालिंदर वंडेकर, विजय वंडेकर, आळेफाटा, राजेश देशमुख नाशिक, चंद्रकांत शेळके, अनिल संकपाळ जगन्नाथ उदुगडे, वैभव बागल, सांगली, सौं.कविता शिंदे खटाव, अर्जुन पिसाळ सातारा, संभाजी जाधव नांदेड, प्रदीप कोरडे हवेली, प्रकाश तरटे आटपाडी सांगली, संतोष मोहिते कडेगाव सांगली, राज सस्ते आटपाडी सांगली, अक्षय घाडगे सांगली, प्रथमेश पवार सातारा, हेमचंद्र नलवडे पुणे, रुपेश मांजरेकर कोकण मुंबई. दिनेश धार पवार, कोकण मुंबई, दाजी बालुगडे, अंतूश पाटील सौ.हर्षदा कडू आदींनी केली आहे.
What's Your Reaction?






