दिल्लीगेट रस्ता शंभर फुटी तर हर्सुल रस्ता दोनशे फुट का...? युनुस पटेलांनी डोके आपटले...

दिल्ली गेट 100 फुट, हर्सुल रस्ता 200 फुट का...? युनुस पटेलांनी डोके आपटले...मार्कींगच्या वेळी राडा, शाब्दिक चकमक....घरकुल बाधित होत असल्याने नाराजी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - जालना रोड सारखा दिल्ली गेट ते हर्सूल मनपा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीवरूनही आज मार्किंग वरुन गोंधळ पाहायला मिळाला. दिल्ली गेट पासून हर्सूल टी पाँइंटपर्यंत रस्ता शंभर फुटांचा मग हर्सूल टी पॉइंटपासून मनपा हद्दीपर्यंत हा रस्ता दोनशे फुटाचा का करण्यात आला हा प्रश्न पथकाला विचारत हर्सुलवासीयांनी नाराजी व्यक्त केली. शहरात रस्ता अरुंद, तर बाहेर मात्र रुंद का, रस्त्याची रुंदी एकसमान का नाही, असा प्रश्न मंगळवारी हर्सूलवासियांनी मार्किंगदरम्यान उपस्थित केला.
काँग्रेसचे माजी नगरसेवकाने घेतले डोके आपटून...
मार्किंग सुरु करताना नागरी मित्र पथकासह हर्सुल येथे गेलेल्या मनपाच्या पथकासोबत माजी नगरसेवक युनुस पटेल यांचा शाब्दिक वाद झाला. मार्किंग साठी गेलेल्या अधिकारी कर्मचा-यांना मनपा आयुक्तांसोबतच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती पटेल जमावाला सांगत होते. त्यावेळी एकच गर्दी झाल्याने माजी सैनिकांनी त्यांना चर्चा उधर करो, चलो हटो असे म्हणत बाजूला जाण्यास सांगितले. त्यावरुन युनुस पटेल संतापले. त्यांनी म्हटले हटो नाही नाही म्हणायचे मी जीव देईल पण हटणार नाही. असे म्हणत त्यांनी जवळच्या लोखंडी ग्रील वर डोके आपटले. आम्ही चोर नाही. मालक आहोत तुम्ही आमच्या जागेचे काय देणार आहात असा प्रश्न विचारला.
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत मंगळवारी नगररचना विभागाच्या वतीने हर्सूल परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी 60 मीटर रुंद रस्त्यासाठी मार्किंग करण्यात आली. हर्सूल हे गाव महापालिकेच्या स्थापने पूर्वीपासून आहे. हर्सूल हे गावठाण आहे. याठिकाणी वडिलोपार्जित जागेवर घरे बांधलली आहेत. त्यामुळे आमचे अतिक्रमण नाही. त्यामुळे आमची बांधकामे पाडायच्या अगोदर जागेचा मोबदला द्या, तरच जागेला हात लावा. अशी भूमिका यावेळी नागरिकांनी घेतली. यावेळी बजरंग बली मंदिराजवळ पथकातील काही कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचा वादही झाला. एका बाजूने 30 मीटर व दुस-या बाजूने 30 मीटरसाठी मार्किंग करण्यात येत आहे. आधीही रस्ता रुंदीकरणात घरे गेलेली आहे. मंदिराला तसेच धार्मिक स्थळांच्या जागेचाही मोबदला दिला. त्यामुळे स्वखुशीने गावकऱ्यांनी जागा दिली. टीडीआर लोकांना नकोय. मोबदला फक्त रोख रकमेत द्यावा. आता पुन्हा होणाऱ्या कारवाईत मंदिर पूर्णपणे जात आहे. जुने गाव 50 टक्क्यावर उठू लागले आहे. शहरात आल्यामुळे गावाच्या बाजूला नवीन वसाहत झाली आहे, पण आजही जुन्या गावाच्या खाणाखुणा आहेत, मंदिर, मस्जिद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुने घरे, सगळे चालले आहे असे नागरिकांनी सांगितले. अखेर टी पॉइंटपासून हर्सूल मनपा हद्दीपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी मार्किंग करण्यात आली.
सन 2023-24 मध्ये पंतप्रधान आवास योजनेत घरकूल मिळाले. या योजनेतून त्यांनी घर उभारले, आता तेही रस्ता रुंदीकरणात पाडण्यात येणार आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मार्किंग केल्यानंतर आता फक्त पाच फूट जागा शिल्लक राहत आहे. सरकारने आमचा विचार करावा. परवानगी दिल्यानंतर आम्ही बांधकाम केले. मोबदला दिला तर नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर येवू, मोबदला मिळाला पाहिजे. आता स्वस्ताई नाही किती महागाई वाढलेली आहे. गरिबांनी काय करावे अशी आपबिती रुख्मणबाई वाणी यांनी सांगितली.
What's Your Reaction?






