वक्फ मालमत्तांवर भाडेकरार नसल्यास बुलडोझर कार्यवाई अटळ - समीर काझी

 0
वक्फ मालमत्तांवर भाडेकरार नसल्यास बुलडोझर कार्यवाई अटळ - समीर काझी

वक्फ मालमत्तेवर भाडेकरार नसल्यास बुलडोझर कारवाई अटळ...

15 दिवसात भाडेकरार करा - समीर काझी यांचा इशारा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - सध्या शहरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रास्ता रुंदीकरणासाठी युद्धस्तरावर बुलडोझर कररवाई सुरू आहे. यात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकीच्या मालमत्ताही येतात. अनेकांनी वक्फ बोर्डाशी भाडेकरार न करता अवैधरीत्या टोलेजंग इमारती उभ्या केल्या. असल्या मालमत्तेवर ही बुलडोजर कारवाई शक्य आहे. म्हणून ज्या वक्फ मालमत्ता धारकांना बोर्डाशी रीतसर भाडेकरार केला नाही त्यांनी पंधरा दिवसाच्या आत भाडेकरार करून घ्यावा, नसता बुलडोझर कररवाई अटळ आहे. असा इशारा मालमत्ताधारकांना बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिला आहे.

शहरात होत असलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकरणी वक्फ मालमत्तांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जालना रोड, हर्सुल रोडवरील अनेक मालमत्ता या वक्फ मंडळाच्या अखत्यारीत येतात. अनेकांनी रीतसर भाडे करार न करता मालमत्तेवर घरे-दुकाने बांधली. या वर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी वक्फ मालमत्ता बाबत भमिक मांडली. ज्या मालमत्ता वक्फ मंडळाच्या आहेत,त्या शासकीय नियमाच्या अधीन राहून कारवाई करण्यात येईल. त्यात भाडेकरार करणाऱ्यांना दिलासा देण्यात येईल, मात्र अनधिकृत बांधकामांची गय केली जाणार नाही. डीपी रस्त्यावर अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेच्या अनुषंगाने शहरातील मुस्लिम समुदायातील धर्मगुरूंशी बैठक ही प्रशासकांनी घेतली. बोर्डाचे विशेष अधीक्षक खुसरो खान हे यावेळी उपस्थित होते. त्यांच्या वतीने बैठकीत बोर्डाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. बैठकीत युवकांना जागा देण्याच्या संदर्भात, तसेच काही अडचणी निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांविषयी चर्चा झाली.

वक्फ जमिनींचा उपयोग समाजासाठी करणार...

वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले की, वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई केली जाईल. समीर काझी यांनीही या बाबत स्पष्ट केली की, युवकांसाठी वक्फच्या जमिनींवर प्रशिक्षण व व्यवसायासाठी जागा देण्याचा विचार सुरू आहे, परंतु यासाठी त्या जागा अतिक्रमणमुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने निर्णय घेतला आहे की, अतिक्रमण झाल्यास संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई होईल, मग ती वक्फ मालमत्ता असो किंवा सामान्य मालमत्ता.

या मोहिमेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या वक्फ मालमत्तांवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, त्या जागांची पुनर्रचना करून वक्फ बोर्डाच्या नियंत्रणात आणले जाईल. हे काम एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल.

अतिक्रमण थांबवून त्याचा उपयोग समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी केला जाईल, हेच या कारवाईचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow