बोगस जन्मप्रमाणपत्र प्रकरण चिघळले, एमआयएमचा सोमय्यांना विरोध, कार्यकर्त्यांना अटक...
 
                                 
बोगस जन्मप्रमाणपत्र प्रकरण चिघळले, एमआयएमचा सोमय्यांना विरोध, कार्यकर्त्यांना अटक...
एमआयएमचा विरोध प्रदर्शन, कार्यकर्त्यांना केली अटक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) -
शहरात उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या दोनशे जन्म प्रमाणपत्राची व आधार कार्डवर असलेल्या जन्म तारखेत तफावत आढळून आली आहे. असे खोटारडे कागदपत्रे सादर करुन अर्जदारांनी 500 हुन अधिक जन्म प्रमाणपत्र हस्तगत केले आहे. रोहिंग्या व बांगलादेशी शेजारी देशातून आपल्या देशात घुसखोरी करत आहे अशी चिंता पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरील भाषणात व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक व पोलिस अधिका-यांसोबत काल मुंबईत बैठक झाली. यामध्ये राज्यात बोगस जन्म प्रमाणपत्राबाबत 28 गुन्हे दाखल आहे. या प्रकरणात लवकरच चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन याप्रकरणी पुरावे सादर केले आहे. उपविभागीय अधिकारी यांची याप्रकरणी चौकशी करावी, कोणी कीतीहि विरोध केला तरी घुसखोरांना सोडणार नाही अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
सिटी चौक पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी तक्रार दिली. पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कायदेशीर कार्यवाई केली जाईल.
यावेळी सिटी चौक पोलिस ठाण्याबाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांच्या दौ-याचा विरोध केला. राज्यात दौरा करुन सोमय्या द्वेष पूर्ण वक्तव्य करुन दोन समाजात तेढ निर्माण करत आहे. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत आहे. मस्जिद वरील भोंगे काढण्यासाठी तेच जवाबदार आहे. चौकशी करा एकही घुसखोर शहरात मिळणार नाही. किरीट सोमय्या यांच्याशी बोलायचे आहे... काही प्रश्न विचारु द्या अशी विनंती पोलिस अधिका-यांना एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी यांनी केली. कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या हाय हायचे घोषणा करत विरोध केला. यावेळी नासेर सिद्दीकी, हाजी इसाक खान व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आणले कार्यवाई करत समज देवून सोडण्यात आले.
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            