शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा होईपर्यंत संजय केनेकर वाढदिवस साजरा करणार नाही...

 0
शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा होईपर्यंत संजय केनेकर वाढदिवस साजरा करणार नाही...

शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा होईपर्यंत संजय केनेकर वाढदिवस साजरा करणार नाही...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) -

शासनाच्या योजनेअंतर्गत शहरात सुरु असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत व नागरीकांना वेळेवर व नियमित पाणीपुरवठा होईपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही असा संकल्प आमदार संजय केनेकर यांनी केला आहे. उद्या 17 जूलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे परंतु एकदिवस अगोदर एक पत्रक काढून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना संदेश दिला आहे. 

त्यांनी पत्रकात म्हटले आहे दरर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रेमाने शुभेच्छा, आशिर्वाद देवून माझ्यावरील आपले प्रेम व्यक्त करता. त्याबद्दल मी मन:पूर्वक आभार मानतो. शुभचिंतकांनी जाहिरातबाजी, बॅनर, हार-फुले, भेटवस्तू यावरचा खर्च टाळावा. त्याऐवजी सामाजिक उपक्रम, पर्यावरण सेवा, जनहितार्थ उपक्रम राबवावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून प्रेरित होऊन आईसाठी एक रोप, निसर्गासाठी वचन या संकल्पनेतून संकल्प करत आहे. अधिवेशनात दिवसभर व्यस्त असणार आहे. सोशलमिडीयावर शुभेच्छा संदेश द्यावा. 17 जुलै रोजी भेटण्यासाठी उपलब्ध राहणार नाही फोन प्रत्यक्ष घेणे शक्य नाही. आपन सर्व शुभेच्छूक माझ्या आजपर्यंतच्या राजकिय प्रवासातील सर्वात मोठी ताकत आहे यापुढेही आपले प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद असेच अखंड राहावेत हिच मनापासून सदीच्छा...

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow