ध्वजारोहणाने हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियानाची सुरुवात...

ध्वजरोहणाने हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियानाची सुरुवात...
सांस्कृतिक कार्य भारत सरकार नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार देशभर दिनांक 3 ऑगस्ट 2025 पासून ते दिनांक 15 ऑगस्ट 2025 पर्यंत “हर घर तिरंगा” अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सिद्धार्थ उद्यान येथे सकाळी 9.45 वा. ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री.अतुल सावे, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण, अपरंपारिक ऊर्जा व दुग्धविकास, महाराष्ट्र राज्य, श्री.जी. श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, श्री. विरेंद्रसिंह, कमांडर 97 आर्टिलरी ब्रिज, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते शूरवीरांना अभिवादन करून पुष्पचक्र अर्पित करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व ध्वनिवंदन करून “राष्ट्रीय गीत” व “राज्य गीत” महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या विविध वाद्यांच्या म्युझिकल बँडद्वारे वाजविले.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना देशासाठी धैर्याने, शौर्याने लढले त्यांना व शहीद झालेल्यांच्या नावे त्यांच्या कुटुंबीय वीरपत्नी, वीरमाता यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे तिरंगा ट्रॉफी देण्यात आले. त्यांना सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार, सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर असा संगितमय बँडद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.
उपस्थित मान्यवरांनी व सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तिरंगा सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत सेल्फी काढले. प्रसार माध्यम व सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्यात आला. यावेळेस बलून डेकोरेशन, सेल्फी बूथ, तिरंगा रंगोळी काढण्यात आली होती.
यावेळी मुख्य लेखापरीक्षक डॉ शी. बा. नाईकवाडे, शहर अभियंता फारुख खान, उप आयुक्त लाखीचंद चव्हाण, विकास नवाळे, नंदकिशोर भोंबे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, कार्यकारी अभियंता विद्युत मोहिनी वारभुवन, आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा भोंडवे, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू व इतर अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
उद्याचे कार्यक्रम...
"हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत, दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी क्रांतीचौक येथे तिरंगायात्रा, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा प्रश्नमंजुषा, तिरंगा प्रकाशयोजना व सजावट, तसेच तिरंगा महोत्सव आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम मा. आयुक्त तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मान्यवर व नागरिकांच्या सहभागातून संपन्न होणार आहेत.
या कार्यक्रमांतर्गत क्रांतीचौकातून तिरंगायात्रेला सुरुवात होईल. यात शालेय विद्यार्थी देशभक्तीपर वेशभूषेत देखावे सादर करतील. सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या हाती तिरंगा ध्वज असेल आणि "हर घर तिरंगा" लावण्यासाठी जनतेला प्रोत्साहित केले जाईल. यात्रेदरम्यान साऊंडसिस्टमवर देशभक्तीपर गीतांबरोबरच जयघोषाचे स्वर दुमदुमतील. ही यात्रा संत एकनाथ रंगमंदिर येथे पोहोचेल.
त्यानंतर संत एकनाथ रंगमंदिर येथे श्री. शरद दांडगे यांचा "ओम पंचनाद" हा विशेष कार्यक्रम होणार आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 2006 व 2011 मध्ये, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2011 मध्ये आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया 2011 मध्ये नोंद असलेले, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम तलवादक असलेले श्री. दांडगे यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित हा अद्वितीय कार्यक्रम सादर करणार आहेत. श्री. दांडगे हे श्री. ज्योतीर्लींग वेरुळ घुष्णेश्वर मंदिर, वेल्लूर येथील 12 वे ज्योतिर्लिंगाचे पुजारी असून श्री. अनंत आंबानी यांच्या लग्नात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या निमित्ताने गायक श्री. रविंद्र खोमणे (गौरव महाराष्ट्र विनर, संगीत सम्राट विनर, ‘सुर नवा ध्यास नवा’ उपविजेता व सुप्रसिद्ध पार्श्वगायक) तसेच प्रा. श्री. रमेश धोंडगे यांच्या सुरस्पंदन ऑर्केस्ट्रा संगीत रजनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभक्तीपर गीते, नृत्य, नाट्य, वादन, तिरंगा प्रतिज्ञा आदी मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल.
What's Your Reaction?






