आता झळकणार भावी नगरसेवकांचे बॅनर...?

 0
आता झळकणार भावी नगरसेवकांचे बॅनर...?

आता झळकणार भावी नगरसेवकांचे बॅनर...?

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान भावी खासदार आणि भावी आमदारांचे बॅनर झळकताना बघितले आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होत नाही तोपर्यंत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर काही शहरात झळकत आहेत. यानंतर भावी नगरसेवकांचे बॅनर झळकणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीला विधानसभेत घवघवीत यश मिळाल्याने आता महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे पुन्हा सत्ता राज्यातील जनतेने दिली आहे. ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका रखडले आहे. ओबीसी आरक्षण व वार्डरचना या वेगवेगळ्या वादांमुळे प्रशासकीय व कायदेशीर बाबीत अडकल्या आहेत म्हणून सध्या या महापालिकांवर प्रशासक कामकाज बघत आहेत. यावर राज्याची सत्ता स्थापनेनंतर तोडगा निघण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) महापालिकेवर सन 2020 पासून प्रशासक काम बघत आहेत. एप्रिल 2025 मध्ये दहा वर्षे हि निवडणूक झाली नाही. जानेवारी किंवा फेब्रुवारी पर्यंत या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने शहरात भावी नगरसेवकांचे बॅनर झळकणार अशी परिस्थिती आहे. इच्छूकही आता कामाला सुरुवात करतील. उमेदवारी साठी आत्तापासूनच आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे लाॅबिंग सुरू आहे जसे सध्या मंत्रीपदासाठी लाॅबिंग सुरू आहे.

जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील अशी माहिती डि-24 न्यूजच्या सुत्रांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह काही महापालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. नवीन मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow