संभलच्या घटनेच्या निषेधार्थ एसडिपिआय रस्त्यावर, केले देशव्यापी आंदोलन
संभलच्या घटनेच्या निषेधार्थ एसडिपिआय रस्त्यावर, केले देशव्यापी आंदोलन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज) 24 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश येथील संभलमध्ये जी हिंसाचाराची घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज दुपारी तीन वाजता एसडिपिआय(सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले.
यावेळी उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांनी मागणी केली कि संभल येथील ऐतिहासिक जामा मस्जिद शेकडो वर्षांपासून आहे. न्यायालयाने 1991 धार्मिक सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून दुसऱ्या पक्षाचे ऐकून न घेता सर्वेक्षणाचा निर्णय दिला. जे सर्वेक्षण 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आले त्या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी सहयोग केला परंतु 24 नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा पोलिसांचा फौजफाटा घेऊन अधिकारी आले. यावेळी जमाव जमा झाला लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला. या घटनेत चार निष्पाप युवकांचा बळी गेला. या घटनेचा एसडिपिआय निषेध करते. घडलेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. मस्जिदला न्याय मिळाला पाहिजे. मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत तेथील सरकारने द्यावी. दोषी पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची सखोल चौकशी करून निलंबित करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावे. अल्पसंख्याक समाजाचे धार्मिक स्थळ, अल्पसंख्याक समाज देशात सुरक्षित नाही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी एसडिपिआय उभे राहणार. लोकशाही मार्गाने न्याय हक्काच्या मागणीसाठी देशभरात निषेध आंदोलन शांततेत करण्यात आले अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष साकी अहमद, मोहसीन खान, शेख नदीम, अशरफ पठाण, अबुजर पटेल, मौलाना अबुजर, समीर शहा, शेख रियाज, हाफिज शमीउल्लाह, शेख शफीयोद्दीन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?