स्टाॅप डायरिया मोहिम प्रभाविपणे राबवा - अपर जिल्हाधिकारी अडकूणे
 
                                ‘स्टॉप डायरिया’ मोहीम प्रभावीपणे राबवा- अपर जिल्हाधिकारी अडकूणे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज)
पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार लक्षात घेता बालकांच्या आरोग्यासाठी ‘स्टॉप डायरिया’ मोहीम प्रभावीपणे राबवावी,असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकूणे यांनी दिले.
‘स्टॉप डायरीया’ संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दयानंद पोवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात दि.16 जून ते 31 जुलै या कालावधीत ‘स्टॉप डायरिया’ मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबतचे प्रशिक्षण, घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्व ,हात धुण्याची योग्य पद्धत याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठीचे निर्देश यावेळी देण्यात आले. डायरीया लागण झाल्यापासून त्यांना योग्य उपचार औषधे यासाठी शून्य ते पाच वय वर्ष मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना झिंक आणि ओआरएस चे दोन पॅकेट त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयी समुपदेशन अशा कार्यकर्तेद्वारे करण्यात येणार आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करण्याचे ही नियोजन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे समन्वयक यांनी सांगितले. प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण यामध्ये मिझर रूबेला याचे लसीकरण मोहीम प राबवून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बालकांचे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. व प्रत्येक तालुका स्तरावरून पावसाळ्यातील आजाराविषयी वेळोवेळी निदान आणि उपचार करण्याबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी डॉ.अभय धानोरकर यांनी सांगितले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            