कृषी शास्त्रज्ञ शेतावर, विकसित कृषि संकल्प अभियानास प्रतिसाद

कृषी शास्त्रज्ञ शेतावर;विकसित कृषि संकल्प अभियानास प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज)-केंद्रीय कृषि मंत्रालय, भारत सरकार यांच्या नेतृत्वात आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, कृषि विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि सोयगाव या गावात विकसित कृषि संकल्प अभियान-2025 राबवण्यात येत आहे. या अभियानाला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील 24 गावात प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत संस्थेतील शास्त्रज्ञ, केव्हीके / विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, गावातील सरपंच व इतर पदाधिकारी तसेच गावातील प्रगतशील शेतकरी बांधाव सहभागी होऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये शेतकरी बांधवांना बीज प्रक्रिया, बीज उगवणक्षमता तपासणी, माती परिक्षण सुधारित लागवड तंत्रज्ञान इत्यादी बाबींवर प्रात्यक्षिका द्वारे माहिती देण्यात येत आहे. मोहिमेचे उद्दिष्टांमध्ये क्षेत्रानुसार खरीप हंगामात पिकवल्या जाणाऱ्या प्रमुख पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना जागरूक करणे, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सरकारी योजना-नीतींबद्दल जागरूक करणे, शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्य कार्डात सुचवलेल्या विविध पिकांच्या निवडीसाठी आणि संतुलित खतांच्या वापरासाठी जागरूक आणि शिक्षित करणे, तसेच शेतकऱ्यांकडून फीडबॅक प्राप्त करणे, ज्यामुळे त्यांच्या नवोपक्रम बद्दल वैज्ञानिक माहिती मिळवून संशोधनाच्या दिशेचा निर्धार केला जाऊ शकेल यांचा समावेश आहे. या अभियानात शास्त्रज्ञांनी खरीप हंगाम पूर्व नियोजन, पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय उभारणी, फळबाग लागवड तंत्रज्ञान, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, शासनाच्या विविध योजना, शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, महिला आरोग्य व्यवस्थापन, महिला गृह उद्योग उभारणी, माती परीक्षण व जमीन आरोग्य व्यवस्थापन, शेतीसाठी ड्रोनचा वापर या आणि अशा विविध विषयावर शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे सर्व शास्त्रज्ञांच्या वतीने देण्यात आली. यासोबतच गावातील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सर्व सहभागींना सांगण्यात आल्या. शेतकरी बांधवांचे प्रत्याभरण घेऊन त्यानुसार शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच शेतकरी बांधवांच्या प्रक्षेत्रावर भेटी देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेऊन शेती संदर्भातील योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक 6 ते 9 जून या कालावधीत फुलंब्री तालुक्यातील 24 गावात तर दिनांक 10 जून व 11 जून रोजी सिल्लोड तालुक्यातील 12 गावात तर दिनांक 12 जून रोजी सोयगाव तालुक्यातील 6 गावात राबवण्यात येणार आहे. या अभियानात केव्हीके प्रमुख डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, अशोक निर्वळ, किशोर शेरे, सतीश कदम, शिवा काजळे,जयदेव सिंगल, जयदीप बनसोडे, विशाल दाभाडे यांच्यासह केव्हीकेचे सर्व कर्मचारी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प कार्यालय येथील शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी, इफको व इतर विविध विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी होऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत आहेत.
What's Your Reaction?






