वेलकम शैक्षणिक व सामाजिक संस्थेला समाज भुषण पुरस्कार जाहिर....

 0
वेलकम शैक्षणिक व सामाजिक संस्थेला समाज भुषण पुरस्कार जाहिर....

वेलकम शैक्षणिक व सामाजिक संस्थेला समाज भुषण पुरस्कार जाहिर....

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) शहरात शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेली वेलकम शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतीक संस्थेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार-2023-24 जाहिर झाला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दिल्या जाणा-या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी या संस्थेची निवड झाली आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्यांक शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, जनजागरण आणि सामाजिक परिवर्तनासाठी संस्थेचे दशकभरातील मौलिक कार्य गौरवास्पद ठरले आहे. 

प्रादेशिक उपायुक्त व सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग छत्रपती संभाजिनगर यांनी संस्थेचे सचिव अॅड अझहर पठाण यांना अभिनंदन पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कृष्णा महाडिक, मोहसिन पठाण उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण सोहळा 10 जून रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पाॅईंट येथे संपन्न होईल. वेलकम संस्थेचे अध्यक्ष जफर खान, सचिव अॅड अझहर पठाण यांचे समाजसेवेतील प्रेरणादायी कार्यासाठी सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow