पाणी पुरवठा लुटु पुटुची लढाई सर्वजण मिळून अधिका-यांची दिशाभूल करीत आहे - राजेंद्र दाते पाटील
पाणी पुरवठा लुटु पुटुची लढाई -सर्वजण मिळुन अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत - राजेंद्र दाते पाटील
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) औरंगाबाद शहरा साठी असलेली नविन पाणी पुरवठा योजने बाबत प्रशासनाने दिलेल्या आदेशा विरुद्ध वागत असून एवढेच काय तर कंत्राटदार जे.व्ही.पी.आर हे सातत्याने प्रशासनाच्या सुचना गांभीर्याने घेत नसल्यामुळे समस्त शहर वासियांना कंत्राटदार- यांचे सह पी एम सी व महाराष्ट्र जीवन हे सर्व प्राधिकरण प्रशासनिक अधिकाऱ्यांना मुर्ख बनवत आहेत असे प्रतिपादन उच्च न्यायालया समोर जनहीत याचिके द्वारे जनतेची बाजु मांडणारे जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे.
कॉफरडॅमचे सध्या होत असलेले काम हे निविदा आणि त्या मध्ये असलेल्या अटी आणि शर्ती नुसार होत नसून आज तगायत धरणाच्या उच्चतम पातळी पर्यंत त्याची उंची वाढविलेली नाही असे वेळो वेळी सिद्ध झाले असून पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनॅजमेंट कन्सल्टन्ट असून नसल्या सारखी असून करोडो रुपयांची देयके जमा करण्या शिवाय काही एक काम करीत नसून अशी निष्क्रीय यंत्रणा कशासाठी पोसल्या जात आहेत ? असा परखड सवाल शासना समोर जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे.
ही सर्व बाब म्हणजे शहर वासियांना पाण्यापासून वेठीस धरण्याचा प्रकार असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यातील इतर पाणी पुरवठा प्रकल्पात स्वतः तज्ञ म्हणून कार्यरत इथे मात्र पी एम सी नेमला असून ही उधळपट्टी कशासाठी ? सोळाशे ऐंशी कोटी पेक्षा मोठ्या असलेल्या प्रकल्पास " यशच अपयश " मिळवून देईल असे अनेक वेळा जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी नमुद केले आहे.
कंत्राटदार आणि स्वतः महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे सह पी.एम.सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनॅजमेंट कन्सल्टन्ट सामाजिक बांधिलकी अजीबात लक्षात घेत नसून या प्रकल्पात पेच निर्माण करीत असल्याचे सातत्याने स्पष्ट होत असून आपल्या कर्तव्या पासुन दूर राहून कर्तव्या पार पाडण्यात कसूर करीत असल्याची अत्यन्त महत्वाची व गंभीर बाब जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी प्रशासना समोर आणली आहे.
वरील सर्व सदरची पाणी पुरवठा योजना मध्ये निर्माण झालेल्या मानव निर्मित अडथळे दूर करण्यास कारणी भुत ठरत असून अनेक वेळेस कॉफरडॅमच्या परिमाण बाबत सत्यता समोर आणली जात नसून अद्यापही परिमाने अंतिम होत नसून सदरची मोजमापे घेण्याचे काम संयुक्त रित्या करण्याचे निश्चित असतांना देखील कंत्राटदार विशिष्ट हेतूने जायेमौका प्रत्यक्ष हजर का रहात नाही ? हा अत्यन्त गंभीर व अति महत्वाचा सवाल जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी प्रशासना समोर उपस्थित केला आहे. "ठपके कार " असलेल्या अधिकाऱ्यांच्या सहा सहा महिन्याचे नियुक्तीचे खेळ या पुर्वीच त्यांनी उधळून लावला असुन या पुर्वी देखील अशाच त्रुटी त्यांनी उच्च न्यायालया समोर जनहीत याचिकेद्वारे आणल्या होत्या म्हणून शहर वासियांना " सतरा हजार " पेक्षाही जास्त आकारण्यात येऊ पाहणारी पाणी पट्टीचा डाव त्यांनी उधळून लावला होता हे शहर वासियांना ज्ञात आहे.
या सर्व दिरंगाई मुळे औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेच्या संकल्पीत पैठण येथील जायकवाडी धरणात उभी करावयाच्या उद्धभव विहरी भवताली निर्माण करावयाच्या कॉफरडॅमच्या परिमाणांच्या परीगणने साठी म्हणजे
" कॉफेरडॅम क्वांटिटिज क्यालक्युलेशन बॅथोमॅट्रीक सर्व्हे रिपोर्ट " वर होत असल्याचे मत जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी प्रशासना समोर उपस्थित केले असून कंत्राटदार सातत्ययाने सदरची मापे स्वतः एकतर्फी घेऊन परिमाणात म्हणजे त्या मापात वाढ करुन निव्वळ जास्तीचे देयके प्राप्त करुन घेण्याचा हा प्रकार असून कंत्राटदार खोटी व चुकीचे हमी प्रशासनास देऊन कॉफरडॅम पावसाळ्यात पाणी आल्यावर सुद्धा क्षतीग्रस्त होणार नाही व जॅकवेलचे काम अडणार नाही असे सांगत असतांना प्रोजेक्ट मॅनॅजमेंट कन्सल्टन्ट आणि स्वतः महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काय करत असते ? असा अत्यंत महत्वाचा सवाल जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी प्रशासना समोर उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा स्थितीत लुटु पुटुची लढाई केल्या सारखे कंत्राटदारास निविदा मधील अटी आणि शर्तीचे उल्लंघन होत असून यात सुधारणा न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र देऊन जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा खेळ खेळत असून नामांकीत व अनुभवी प्रोजेक्ट मॅनॅजमेंट कन्सल्टन्ट नसल्यामुळे ही बाब सतत घडत राहणार असल्याची गंभीर बाब जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी प्रशासना समोर उपस्थित करतांना दुरदृष्टी आणि अनुभव नसलेल्या पीएमसी या प्रकल्पात नेमण्या ऐवजी या प्रकल्पासाठी मेट्रो- कोंकण रेल्वे या सारख्या प्रकल्पा वर नियुक्त करत असलेले सक्षम पीएमसी नेमणे गरजेचे असून ही बाब जेष्ठ जलअभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी शासनास वेळोवेळी लेखी कळवलेली असून योग्य पीएमसी नेमल्यास आणि असे झाले तरच सध्याचा कंत्राटदार हा सदरचा महत्वाचा प्रकल्प पूर्ण करू शकेल व वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठका घ्याव्या लागणार नाहीत.
वास्ताविक पहाता एका कॉफेरडॅमने विहिरीचे काम पूर्ण होणे गरजेचे असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पन्नास कोटी खर्च वाढवून पाईलडॅमचे काम सुरू केले म्हणजेच कॉफेरडॅमचा खर्च अनावश्यक होऊन किवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला कॉफेरडॅमवर विश्वास नाही का ? याबाबत शंका निर्माण होत असून
याशिवाय कॉफेरडॅमच्या भोवताली अर्धवट मेनकापड पॉलीथीन टाकून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअतांत्रिक काम करत असल्याचे निदर्शनास आणून देण्याचे जागरूक नागरीक म्हणून
जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी शासनास अनेक वेळा प्रकल्पातील त्रुटी लेखी स्वरूपात निदर्शनास आणून
दिलेली असून यामुळे कॉफेरडॅम च्या कामावरच अत्यन्त तांत्रिक प्रश्नचिन्ह जेष्ठ जल अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी उपस्थित केले आहे.
What's Your Reaction?