शहाबाजारात दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्येने खळबळ...!

 0
शहाबाजारात दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्येने खळबळ...!

शहाबाजारात दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्येने खळबळ...!

मित्रानेच केला मित्राचा घात...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज)- जुन्या वादातून सायंकाळी 5 ते 5.15 वाजेदरम्यान शाहबाजार निशान जवळ दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याची तलवारी व तीक्ष्ण हत्याराने जाधवमंडी येथे भाजीविक्री करणा-या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येचा फुटेज सिसिटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे. 

मालेगाव येथील सध्या काचीवाडा येथील समीर खान इनायत खान, वय 27 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मागिल दहा वर्षांपासून हा युवक भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली आहेत. दिवसाढवळ्या तोंडाला कपडा बांधून मारेकरी हे सिसिटीव्हिमध्ये तलवारी घेऊन येत असल्याचे दिसत आहे. धारदार शस्त्राने गळा चिरून हत्येनंतर मृत व्यक्तीच्या आसपास रक्ताचा सडा बघून अंगावर काटा येईल असे भयानक चित्र होते. घटनेची माहिती मिळताच झोन-१ चे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी व पोलिस कर्मचारी यांनी धाव घेतली. फाॅरेन्सिक टिम दाखल झाली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. 

पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले या घटनेतील तीन आरोपिंना अटक करण्यात आली आहे. समीरच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेत आणखी आरोपी आहेत का तपास केला जात आहे. परिसरात चर्चा सुरू होती की काही दिवसांपूर्वी मित्रा मित्रांमध्ये वाद झाला होता आज वाद पुन्हा उफाळून आला आणि हि दुर्देवी घटना घडली असावी.

या घटनेतील आरोपी आसिफ रायडर, शोएब काला, ईसरार खान यांना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिसांचा शाह बाजार येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहा बाजार खून प्रकरणातील सिसिटीव्ही चित्रणातून नासेर उर्फ इन्ता, इसरार खान, शोयेब या तिघांची ओळख पटली आहे. या तिघांनीच समीरवर प्राणघातक हल्ला केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपिंना अटक केली आहे. 

कसा झाला पूर्वीची चाकूहल्ला घटना...

दि.28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास शोएब अन्वर खान, वय 21 , राहणार एसटी काॅलनी, फाजलपुरा , छत्रपती संभाजीनगर हा पंचायत समीती जवळील मोकळ्या जागेत ट्राव्हल्सची गाडी उभी करून उभा असताना शाहरुख, समीर खान आणि त्यांचा एक साथीदार हे मोपेडवरुन आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन शाहरुखने शोएबला शिविगाळ करत हातातील चाकूने वार केला. यानंतर समीर खान आणि त्यांच्या साथीदारानेही शोएबला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow