जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महीलेने स्वतःला जाळून घेतल्याने खळबळ
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महीलेने जाळून घेतले, उपचारासाठी घाटीत दाखल
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोरील स्मार्टसिटी बस स्टापच्या बाजूला राहण्यासाठी बस्तान मांडलेल्या एका महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती महीला मनोरुग्ण असल्याचे बोलले जाते. त्या महीलेने त्या सार्वजनिक ठिकाणी भिंत बांधण्यासाठी विटा आणले असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ते साहित्य आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घेऊन गेल्याने त्या अज्ञात महीलेने स्वतःला इंधन टाकून जाळून घेतल्याने खळबळ उडाली. तेथे आंदोलन करण्यासाठी नेहमी लोकांची वर्दळ असते. उपस्थित पोलिस व नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ती महीला गंभीर जखमी झाली आहे. ती महीला कोण होती, बेवारस होती का, त्या महीलेने टोकाचे पाऊल का उचलले, आत्महत्या करण्याचा प्रयत्न कशासाठी केला. या घटनेत चौकशी झाल्यावर कळेल. यामध्ये प्रशासनाची काही चूक आहे का...हे सत्य चौकशी झाल्यावर कळेल. एक बेवारस महीला सार्वजनिक ठिकाणी राहत असेल तीची समजूत काढून राहण्याची व्यवस्था केली असती तर हि घटना घडली नसती अशी चर्चा शहरात केली जात आहे.
या दुर्देवी घटनेबद्दल काय म्हणाले समाजसेवक सुमीत पंडीत...
जाळून घेतलेल्या सदर मनोरुग्न महिलेचे नाव समीक्षा संभाजी खंडारे असून ही मनोरुग्ण महिला शहरात बेवारस अवस्थेत फिरते लोकांना शिवीगाळ करते व हिंसक वागते या कारणाने दिनांक ७-६-२३ रोजी आम्ही तिला सिटी चौक पोलीस स्टेशन व मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून घाटी रुग्णालयात प्रथम उपचाराकरिता दाखल केले होते.ती मनोरुग्न असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर तिला पुढील उपचार कामे बेवारस असल्याने दिव्य सेवा प्रकल्प बुलढाणा येथे पुनर्वसनासाठी दाखल केले होते.परंतु ती तेथूनही परत शहरात आली व कलेक्टर ऑफिस येथे बेवारस फुटपाथवर वास्तव्य करीत होती
--------- समाजसेवक सुमित पंडित
What's Your Reaction?