घरफोडी करणा-या चोरट्याला गावकऱ्यांनी चोपले, ग्रामीण पोलिसांनी केली अटक, दोन फरार

 0
घरफोडी करणा-या चोरट्याला गावकऱ्यांनी चोपले, ग्रामीण पोलिसांनी केली अटक, दोन फरार

घरफोडी करणारा चोरटा अखेर जेरबंद...दोन चोरटे फरार, एकाला गावकऱ्यांनी चोपले....

पिशोर , दि.18(डि-24 न्यूज) स.पो.नि. देविदास वाघमोडे असे पो.स्टे.ला हजर असतांना, दुपारी 2.30 वा. गोपनीय बातमीदाराने फोनव्दारे कळविले की, नादरपुर फाटयावरील सोमीनाथ सांडु निकम यांच्या राहते घरामध्ये चोरी करणारा चोर (आकाश छगन काळे रा. अंतापुर ता. गंगापुर) पकडुन ठेवला आहे. त्याला लोकं मारहाण करीत आहे. असे कळविल्याने आम्ही स्वतः, पोलीस अंमलदार विलास सोनवणे, गजानन कन्हाळे, करण म्हस्के, संतोष घुनावत असे तात्काळ नादरपुर फाटा येथे गेलो. सदर ठिकाणी लोकांची गर्दी (घोळका) जमा झालेली होती, त्या घोळक्यामध्ये आकाश काळे याला लोकांनी पकडुन ठेवलेला होता. त्याला लोकांनी मारहाण केल्यामुळे, त्याला मार लागलेला होता. त्यामुळे त्याला तात्काळ पिशोर येथील सरकारी दवाखान्यामध्ये पाठविले. सोमीनाथ सांडु निकम याच्या राहते घरामध्ये ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी भेट देऊन, त्याची पाहणी केली. आकाश काळे याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या सोबत असलेले बॉबी संतोष काळे व गुंडया डिचार्ज काळे हे शाईन मोटार सायकल क्रमांक एमएच 17BW 1756 यावरुन पळुन गेले आहे असे समजल्याने, पळुन गेलेल्या दोन्ही आरोपीतांचा तांत्रिक पुराव्यानुसार पिशोर, सिल्लोड ग्रामीण, वडोदबाजार व फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तात्काळ स्वतः देविदास वाघमोडे, पोलीस अंमलदार विलास सोनवणे, परमेश्वर दराडे, गजानन कन्हाळे, दिपक सोनवणे, करण म्हस्के, गणेश कवाल तसेच स्थानिक गुन्हे शाखा (ग्रा) येथील विठ्ठल डोके व आनंद घाटेश्वर यांनी शोध घेतला.

नमुद आरोपीताचा शोध घेत असतांना आम्ही नियंत्रण कक्ष, (ग्रा) यांच्या मार्फतीने जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये नाकाबंदी लावणे बाबत सुचित केले व नाकाबंदी दरम्यान नमुद आरोपीचा शोध घेतला. त्याच प्रमाणे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या मार्फतीने पिशोर, नादरपुर, पिंपरखेडा, बाबरा, कान्हेगांव, भराडी, अंधारी असे आजुबाजुचे गांवातील लोकांना नमुद आरोपीचे वर्णनासह पळुन जाण्यासाठी वापरत असलेल्या मोटार सायकलचे वर्णन सांगुन, नमुद आरोपी दिसल्यास त्या बाबत माहिती कळविले. परंतु फरार झालेले चोरटे आरोपी बॉबी संतोष काळे व गुंडया उर्फ स्वरुप डिचार्ज काळे रा. अंतापुर ता. गंगापुर हे मिळुन आले नाही.

त्यानंतर, आज दि. 18/1/2024 रोजी तक्रारदार सोमीनाथ सांडु निकम वय 28 वर्षे रा. नादरपुर ता. कन्नड यांनी पो.स्टे. पिशोर येथे तक्रार दिली की, मी, नादरपुर फाटया जवळ असलेल्या स्वतःच्या शेतामधील घरामध्ये राहतो, आज रोजी मी, माळेगांव धनगर येथे कामाला गेलेलो असतांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास मला फोनवर माहिती मिळाली की, माझ्या घरामध्ये चोरी झालेली असुन, चोरी करणारा चोर (आकाश छगन काळे) याला पकडुन ठेवले आहे. असे समल्याने मी लगेच माझ्या घरी आलो. चोरी करणारा चोर आकाश काळे याला लोकांनी पकडुन ठेवले होते व त्याला मारहाण केलेली होती. त्याच्या कडे असलेली लोखंडी टॉमी मी पाहिली. त्याला पिशोर येथील दवाखान्यामध्ये घेऊन गेले. त्यानंतर मी, माझ्या घराचा पाठीमागील दरवाज्याची आतील कडी कोंडा तोडलेला होता. घरातील लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये असलेले 20 हजार/- रुपये रोख व 35 हजार रुपये किंमतीचे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 झुब्बे मला दिसले नाही. ते आकाश छगन काळे व त्याचे साथीदार बॉबी संतोष काळे व गुंडया उर्फ स्वरुप डिचार्ज काळे रा. अंतापुर ता. गंगापुर यांनी चोरलेला असल्याची तक्रार दिलेली आहे. पो.स्टे.ला दाखल या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिक्षक श्री मनिष कलवानिया साो, अपर पोलीस अधिक्षक श्री सुनिल लांजेवार सो, उप विभागीय पोलीस अधिकारी कन्नड श्री विजय ठाकुरवाड सो, स.पो.नि. देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. श्री बालाजी ढगारे हे करीत आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला 

सहाय्यक पोलीस निरीक्षक, देविदास बी.वाघमोडे, 

पिशोर पोलिस ठाणे यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow