ऑटो चालक मालक संघटना आंदोलन करुन कंटाळले, लोकप्रतिनिधी व प्रशासनावर संताप....!
ऑटो चालक मालक संघटना आंदोलन करुन कंटाळले, लोकप्रतिनिधी व प्रशासनावर संताप....!
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) अनेकदा आपल्या हक्काच्या मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन, धरणे, निदर्शने व उपोषण आणि मोर्चा व चक्काजाम आंदोलने केली तरीही सरकार, प्रशासनाच्या वतीने मागणीवर तोडगा न काढता अंमलबजावणी होत नाही. लोकप्रतिनिधी सुध्दा साथ देण्यासाठी पुढे येत नाही. निवडणुकीत मतांसाठी हजारो रिक्षा चालकांचा वापर करून घेतला जातो, निवडणूक संपली आपण कोण अशी परिस्थिती असल्याने आगामी निवडणुकीत राजकीय पक्षांना जाब विचारला जाईल. रिक्षा स्टँड साठी महापालिकेच्या समोर परिवारासह रस्त्यावर उतरणार असल्याचा कडक इशारा आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शने आंदोलनात सर्व समावेशक रिक्षाचालक मालक संघटना कृती समितीच्या नेत्यांनी दिला आहे.
हिट एण्ड रन कायदा रद्द करावा व रस्त्यावर अवैध बसची वाहतूक सुरू आहे विना परमिट ई-रिक्षा धावत आहेत. तरी पण काही कार्यवाही नाही. चक्काजाम आंदोलनाच्या वेळी अवैध वाहतुक बंद करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाले पण आतापर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही. पूर्णवेळ आरटीओ नाही यामुळे कामे खोळंबली आहे तरी पण लोकप्रतिनिधी गप्प, ऑनलाईन पावतीमुळे चालक मालक त्रस्त झाले कोणत्याही पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी दबाव टाकण्यासाठी पुढे येत नाही. म्हणून आगामी निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना हिसका दाखवणार असल्याचा इशारा सलिम खामगावकर यांनी दिला आहे.
त्यांनी सांगितले 30 हजार ऑटोरिक्षा चालक मालक यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न वाढत असलेल्या समस्येमुळे गंभीर होत चालला आहे.
ऑटो स्टँड, स्मार्ट सिटी बस व ई रिक्षामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. परमिट बंद करावे, अवैध पार्कींग, स्वतंत्र मंडळ स्थापन करावे, ऑनलाईन पावती बंद करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी काॅ.अभय टाकसाळ, सलिम खामगावकर, अज्जू लीडर, प्रकाश हेंडगे, शेख नजीर, शेख वसीम आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?