सामाजिक बांधिलकीमुळे काळे कुटुंबियांनी केला कार्यक्रम स्थगित...!

सामाजिक बांधिलकीमुळे काळे कुटुंबियांनी केला कार्यक्रम स्थगित...
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री तथा खासदार कै. बाबूरावजी काळे यांची नात व जिल्हा. परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. रंगनाथ बाबूरावजी काळे यांची कन्या कु. देविना व प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे चिरंजीव नचिकेतस् यांचा साखरपुडा समारंभ दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र सध्या महाराष्ट्रभर मराठा समाजाचे आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलने आणि त्यामुळे निर्माण झालेली अनिश्चित परिस्थिती यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून दोन्ही परिवाराच्या वतीने सदर कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील ह्यांच्या ह्या आंदोलनास आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. सामाजिक बांधिलकी व परंपरा आज काळे कुटुंबीयांनी जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.
What's Your Reaction?






