अडीच लाखांचा गांजा पकडला, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई...

 0
अडीच लाखांचा गांजा पकडला, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई...

अडीच लाखांचा गांजा पकडला, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.22(डि-24 न्यूज) 

अवैधरित्या गांजाचा (कॅनबीस वनस्पती) साठा करुन विक्री करणाऱ्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड केले. मनिष राजू पवार (23 वर्ष), राहणार आसेगाव फाटा असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 2 लाख 42 हजार 520 रुपये किंमतीचा 12 किलो गांजा जप्त केला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलताबाद पोलिस ठाणे हद्दीतील आसेगाव फाटा ते आंबेगाव रोडवर मनिष पवार हा गांजाचा (कॅनबीस वनस्पती) साठा करुन विक्री करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक म्हस्के, पोलिस अंमलदार लालखान पठाण, सतीश जाधव, संदिप धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महिला पोलिस अंमलदार ज्योती भोरे, छाया लांडगे, शिल्पा तेलोरे आदींच्या पथकाने छापा मारुन मनिष पवार याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मनिष पवार याच्या ताब्यातून 2 लाख 42 हजार 520 रुपये किंमतीचा 12 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी मनिष पवार याच्याविरुध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow