उमराहसाठी घेऊन जातो म्हणून फसवणूक, ट्राॅव्हल्स एजंट पैसे घेऊन पसार, अॅड जकी नवाब पटेल यांना केसमध्ये यश

 0
उमराहसाठी घेऊन जातो म्हणून फसवणूक, ट्राॅव्हल्स एजंट पैसे घेऊन पसार, अॅड जकी नवाब पटेल यांना केसमध्ये यश

ट्राॅव्हल्स एजंट पैसे घेऊन पसार - पिडीत विरूध्द गुन्हा दाखल –

उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन केली मंजुर –

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमुर्ती पेडनेकर यांनी अटकपुर्व जामीन मंजुर करून हज-उमराह साठी घेऊन जाणाच्या नावाखाली लोकांचे पैशे घेऊन पसार झालेल्या व्यक्ती व्यतीरिक्त सदरील व्यक्तीशी ओळख करून देणार्‍या एक पिडिता विरूध्द शिऊर पोलीस ठाणे ता. वैजापुर येथे दाखल प्रथम खबर 288/2024 मधील आरोपीस दिलासा दिला.

कमरोददीन नावाच्या एका इसामाची ओळख सदरील तक्रारीतील आरोपी बरोबर झाली असता यांनी आरोपीला सांगितले की मी फक्त 45 हजार रूपयात उमराह करण्यासाठी मक्का व मदीनाला घेऊन जाईल व तुम्हाला तेथे हाजी लोकांची सेवा करावी लागेल तसेच तु तुझे नातेवाईक व मित्रांना या बाबत माहिती दे यातील जर आणखी काही लोक जमले तर आपण लवकर निघु. ज्या करिता यातील आरोपीने आपले नातेवाईक व मित्रांना सांगितले जे कोणी तयार झाले त्यांची भेट कमरोददीनशी सदरील आरोपीने करून दिली व लोकांनी सहमती दाखवून उमराह साठी पैशे थेट कमरोददीनला तर काही लोकांनी सदरील आरोपीस रोख व ऑनलाईन व्दारे दिले जे पैशे आरोपीने कमरोददीनला ऑनलाईन पाठविले. कमरोददीनने रक्कम मिळाल्यानंतर उमराहला घेऊन जाण्यासाठी तारीख पे तारीख दिली व नंतर पैशे घेऊन पसार झाला. सदरील बाब आरोपीच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे कमरोददीन व त्यांची पत्नी महेजबीन विरूध्द तक्रार दाखल केली तदनंतर यातील काही इतर पिडीतांनी कमरोददीन व त्यांची पत्नी विरूध्द तक्रार न करता ओळख करून देणारे व स्वत: पिडीत असलेल्या व्यक्ती विरूध्द शिऊर पोलीस ठाणेला तक्रार दाखल केले. सदरील प्रकरणात आरोपीने अटक पुर्व जामीन मिळवण्यासाठी अ‍ॅड. जकी नवाब पटेल व सि. आर. देशपांडे मार्फत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जामीन अर्ज दाखल केला प्रस्तुत प्रकरणात कागदोपत्री पुरावे लक्षात घेऊन न्यायमुर्ती पेडनेकर यांनी आरोपीस अटकपुर्व जामीन मंजुर केला. आरोपी तर्फे अ‍ॅड. जकी नवाब पटेल यांनी काम पाहिले तर शासना तर्पेâ एन.बी. पाटील यांनी काम पाहिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow