जम्मू-कश्मिर, पहलगाममध्ये दहशतवादी भ्याड हल्ला, महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू

जम्मू-कश्मिर, पहलगाममध्ये दहशतवादी भ्याड हल्ला, महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू
मुंबई, दि.22(डि-24 न्यूज) जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या आप्तस्वकीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी इश्वरचरणी प्रार्थना करतो.
जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते कश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करून माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील दोन पर्यटकांची मृत्यू झाला असून त्यामध्ये दिलिप डिसले, अतुल मोने यांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे, दुसरे एस.भालचंद्रराव जखमी झाले आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आपल्या एक्स हॅन्डल अकाउंटवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






