हायकोर्टाकडून आरोपीला अटकपूर्व जामीन, एड जकी, एड देशपांडे यांची कामगिरी...
बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाचा महत्वाचा निर्णय — आरोपीला अटकपूर्व जामीन, ऍड. ज़की नवाब शेख (पटेल) व ऍड. सी.सी. देशपांडे यांची यशस्वी बाजू मांडली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- पडेगाव परिसरात झालेल्या कथित अपघात प्रकरणात आरोपीला मोठा दिलासा देत बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर केला आहे. हा निर्णय न्यायमूर्ती महरोज के. पठान यांच्या खंडपीठाने दिला. या प्रकरणात बचाव पक्षाकडून ऍड. ज़की नवाब शेख (पटेल), ऍड. सी.सी. देशपांडे व ऍड. ऐश्वर्या देशपांडे यांनी यशस्वी युक्तिवाद केला.
प्रकरण असे :
मे 2024 मध्ये छावणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत, पोलीस कॉन्स्टेबल कनड आणिंगाबादकडे येत असताना मिटमिटा जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. या धडकेत शेख मुजम्मिल शेख मतीन गंभीर जखमी झाले होते व त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अपघातानंतर कॉन्स्टेबल घटनास्थळावरून पळून गेले. नंतर त्यांनी या घटनेला वेगळं रूप देत "हल्ला व लूट" अशी खोटी कथा तयार करून अनोळखी व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल केला. आरोपी पोलीस असल्याने त्यांच्या प्रभावामुळे खरी अपघाताची तक्रार उशिरा नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
मागील निर्णयाचा आधार
याच प्रकरणातील सह–आरोपी शेख सुहैल शेख मुन्शी यांना हायकोर्टाने 24 ऑक्टोबर 2024 रोजी जामीन मंजूर केला होता. त्या पार्श्वभूमीवर समानता (Parity) च्या आधारावर सध्याच्या आरोपी शेख मुआज यांनाही अटकपूर्व जामीन देता येईल, असे न्यायालयाने नमूद केले.
सरकारकडून विरोध पण…
सरकारी वकील पी. जे. भारद यांनी चार्जशीट दाखल झाल्यामुळे व नवीन मेडिकल पुरावे जोडल्यामुळे जामीन नाकारावा, असा आग्रह धरला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या संपूर्ण खटल्यात बचाव पक्षाकडून ऍड. ज़की नवाब शेख (पटेल), ऍड. सी.सी. देशपांडे व ऍड. ऐश्वर्या देशपांडे यांनी प्रभावी व यशस्वीरित्या बाजू मांडली.
What's Your Reaction?