उमीद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मोफत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

 0
उमीद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मोफत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

उमीद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मोफत नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - केंद्र शासनाच्या उमीद पोर्टलवर वक्फ मालमत्ता असलेल्या मस्जिद, कब्रस्तान, दर्गा, खानकाए व अन्य मुस्लिम धार्मिक स्थळांची नोंदणी 5 डिसेंबर पर्यंत करणे अनिवार्य आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वतीने राज्यातील धार्मिक स्थळांची नोंदणी केली जात आहे. विविध ठिकाणी शिबिर घेऊन जनजागृती केली जात आहे. 

आज दुपारी बैतूल यतीम येथील सभागृहात एड मसरुर सोहेल खान यांच्या वतीने वक्फ बोर्डाच्या सहकार्याने उमीद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ह्यातील धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला. यावेळी शेकडो नोंदणी झाली असल्याची माहिती एड मसरुर खान यांनी दिली. त्यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले 5 डिसेंबर पूर्वी नोंदणी करुन घ्यावी नाही तर वक्फ मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर अडचणी उत्पन्न होतील. सहकार्य लागले तर वक्फ बोर्ड व आमच्याकडे संपर्क साधावा मदत केली जाईल.

या शिबिरास यशस्वी करण्यासाठी वक्फ बोर्डाचे मुजंमील खान, मोहम्मद मुदस्सर, अब्दुल मतीन, नुरुल मुक्तदीर, शेख इब्राहिम, मोहम्मद रईस, मुफ्ती नासेर, मुफ्ती निसार, समाजसेवक मोहंमद ताहेर खान यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow