मेगा ब्लड डोनेशन कैम्पमध्ये 858 युनिट रक्तसंकलन

 0
मेगा ब्लड डोनेशन कैम्पमध्ये 858 युनिट रक्तसंकलन

मेगा ब्लड डोनेशन कैम्पमध्ये 780 युनिट रक्तसंचलन

औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) दरवर्षीप्रमाणे ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने जमात-ए-इस्लामी हिंद, युथ विंगच्या वतीने मेगा ब्लड डोनेशन कैम्पचे राज्यात आयोजन केले जाते.

औरंगाबाद शहरात चार ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत 858 रक्तदात्यांनी रक्तदान केले अशी माहिती डि-24 न्यूजला युथ विंगचे जिल्हाध्यक्ष शेख जमीर यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले घाटी रुग्णालयातील रक्तपेढीने रक्तसंचलनासाठी सहकार्य केले. शहरातील युवकांनी उत्साह दाखवत रात्री 9 वाजेपर्यंत 858 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सतत पाऊसामुळे व्यत्यय आला तरीही टार्गेट पूर्ण करण्यासाठी युथ विंगच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतल्याने गरीब रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी हे रक्तसंचलन फायद्याचे ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया जमीर यांनी दिली.

कटकट गेट, युनुस काॅलनी येथील मर्कज ए इस्लामी, लाल मस्जिद टाऊन हॉल, पैठणगेट बागवान हाॅल, जमजम हाॅल सिल्कमिल काॅलनी या चार ठिकाणी मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उद्या शुक्रवारी चिकलठाणा येथे दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी युथ विंगचे शहराध्यक्ष सलमान सिद्दीकी, औरंगाबाद मध्यचे अध्यक्ष सलमान यारखान, पूर्वचे इम्रान पठाण, पश्चिमचे अध्यक्ष अब्दुल गफार, सय्यद कलिम, शेख मुश्ताक, खालेद उमर, मुसद्दीक अहेमद, शेख फहीम, आसेफ जोहरी, नासेर जोहरी, तौफीकुल्लाह, काशिफ शेख, आमेर फैसल, इम्रान खान, इम्रान पटेल, जमीर पटेल, शेख अजहर यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow