नामांतरावर पुढील 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी

 0
नामांतरावर पुढील 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी

औरंगाबाद विभाग जिल्हा तालुका गावाच्या नामांतरावर आता 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार...

मुंबई, दि. 29 सप्टेंबर (प्रतिनिधी) औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गावाच्या नामांतरावर बॉम्बे हाय कोर्ट मधे आज 29 सप्टेंबर रोजी मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर याच्या समोर सुनावणी झाली, सुनावणी दरमियान याचिकाकर्ता मोहम्मद हिशाम उस्मानी चे वकील अॅड एस एस काझी यांनी कोर्टात सरकारला घेरले व त्यांनी न्यायालयाला सांगितला की सरकारने लोकांचे आक्षेपावर काहि लक्ष दिले नाही, आणि त्यावर सुनावणी घेतली नाही. याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करण्यात आला की न्यायालयीन या विषयवार (anti status quo) होते त्या परिस्थिती पुन्हा कायम करावी असे स्थगितिचे आदेश द्यावे, त्यावरील न्यायालयाने महाधिवक्ता अॅड सराफला बोलवून जवाब विचारले, दोन्ही पक्षां कडून युक्तिवाद लांबला म्हणू कोर्टाने आता या प्रकरणात आणखी युक्तिवाद साठी हेच प्रकरण 4 ऑक्टोबरला ठेवला आहे.

औरंगाबाद शहर नामांतरावर पण 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

15 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने गॅजेट काढत औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका, औरंगाबाद गावाचे नाव बदल करून छत्रपती संभाजीनगर केल्याची घोषणा केली. याचिकाकर्ता मोहम्मद हिशाम उस्मानी तर्फे अॅड एस एस काझी यांनी युक्तिवाद केला, त्यांना सहकार्य म्हणुन अॅड खिजर पटेल अणि अॅड मोईन शेख न्यायालयात उपस्थित होते. उस्मानाबाद साठी एडवोकेट सतीश ताळेकर यांनी युक्तिवाद् केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow