पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी अक्रामक, केले जोडेमारो आंदोलन...
क्रांतीचौकात राष्ट्रवादीने केले जोडे मारो आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) -
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ दुपारी क्रांतीचौकात कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले. पडळकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना देण्यात आले.
सांगली येथे जे बेताल वक्तव्य करण्यात आले त्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
आंदोलनावेळी बोलत असताना जिल्हाध्यक्ष श्री. पांडुरंग तांगडे पाटील यांनी सांगितले की, आजपर्यंत इतक्या खालच्या पातळीवर बेताल वक्तव्य कोणीच केले नाही. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या पक्षातील गोपीचंद पडळकर यांची पक्षातून हकलपट्टी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
यावेळीमा.आ किशोर पाटील, मा.आ.संजय वाघचौरे, शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, माझी जि. प. सभापती रंगनाथ नाना काळे, माझी जि. प. सभापती हरिश्चंद्र लघाणे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, प्रदेश सरचिटणीस प्रा. सलीम शेख, राजेश पवार, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, मा.गरसेवक मोतीलाल जगताप, तालुका अध्यक्ष सूर्यकांत थोरात, राजेश साळुंखे, प्रसन्ना पाटील, सोमीनाथ शिराने, युवक प्रदेश सचिव प्रकाश इंगळे, युवक शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण तांबे, शहराध्यक्ष सुशील बोर्डे, विष्णू जगताप, अशोक बनकर, उद्धव बनसोडे, रवींद्र तांगडे राजेंद्र चव्हाण, रज्जाक पठाण, सय्यद लाईकउद्दीन, युवती जिल्हाध्यक्ष धनश्री तडवळकर, ललिता ताई मगरे, मंजुषाताई पवार, अनुराधा सोनपसारे, कुलदीप शिंदे, संतोष दांडगे, आरिफ भाई, अन्वर नवाब, अनिल सुरडकर, आनंद मगरे, अजिंक्य किर्जत, आकाश दांडगे, लतीफ कुरेशी, गणेश आदाने, हर्ष पराये, उमेर शेख, तारेख पठाण, अशोक बनस्वाल, अविनाश दांडगे, आबा सावदेकर, राहुल शिंदे, महेंद्र काटेकर, आसेफ पटेल, मयूर मगरे, शाहरुख शेख, इरफान पठाण, आनंद घोडके, उमेश जाधव, इरफान भाई, संघपाल पराडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?