प्रभात फेरीत 5400 विद्यार्थ्यांचा सहभाग, देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांचा डान्स
प्रभात फेरीत 5400 विद्यार्थ्यांचा सहभाग, देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांचा डान्स
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिका तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे.
सदरील कार्यक्रमांचे शुभारंभ आज सकाळी सात वाजता विविध शाळांची प्रभात फेरी काढून करण्यात आले. सदरील प्रभात फेरीचे शुभारंभ आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त मधुकर अरदड आणि आयुक्त तथा प्रशासक संभाजी नगरमहानगरपालिका जी श्रीकांत यांनी हिरवे झेंडे दाखवून केली.
सदरील प्रभात फेरी ची सुरुवात क्रांती चौक येथून झाली आणि पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे याची सांगता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर करण्यात आली.
सदरील प्रभात फेरीत महानगरपालिकेचे तसेच खाजगी शाळांचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, मलखांब कुस्ती क जिम्नॅस्टिक, उशु तसेच भाषण इत्यादीचे कौशल्याचे प्रात्यक्ष सादर करून उपस्थित यांचं मन जिंकले.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री महोदयांनी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम चा संक्षिप्त इतिहास सांगितला आणि या निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदरील प्रभात फेरीचे आयोजन करताना रॅलीच्या मार्गावर कचरा पसरू नये याची विशेष दक्षता घेण्यात आली होती, यावेळी रस्त्यावर पाण्याची बॉटल झाकण इत्यादी कचरा आयुक्तांनी स्वतः उचलला आणि सर्व विद्यार्थ्यांना कचरा घंटागाडीतच टाकावे असा संदेश दिला. प्रभात फेरी च्या वेळेस प्रशासक महोदय विद्यार्थ्यांसमवेत मिसळून गेले आणि त्यांना स्वच्छता आणि शिक्षणबाबत प्रेरणा दिली तसेच त्यांच्या सोबत फोटो ही काढले. प्रभात फेरीचा सांगता कार्यक्रमात आयुक्त महोदयांनी स्वछता बाबत विद्यार्थ्यांना समज दिली आणि प्रभात फेरीत काही विद्यार्थ्यांनी पाण्याची बॉटल, त्याचे झाकण, बिस्किट पुडाचे रॅपर इत्यादी कचरा चालता चालता रस्त्यावर टाकला होता तो स्वतः आयुक्त साहेबांनी पण उचलला आणि रॅलीच्या मागे सफाई कर्मचारी आणि घंटागाडी चालत होती यामुळे प्रभात फेरीच्या रस्त्यावर लगेच स्वछता करण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर त्वरित महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांमार्फत सांस्कृतिक मंडळ येथे स्वच्छता करण्यात आली.
सदरील प्रभात फेरीत महानगरपालिकेचे आठ शाळा आणि चारशे विद्यार्थी आणि खाजगी 33 शाळा आणि पाच हजार विद्यार्थी असे एकूण 45 45 शाळा 5400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
देशभक्ती गीत इस देश का यारो क्या केहना या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी डान्स पण केला.
सदरील कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता अविनाश देशमुख, उप आयुक्त सोमनाथ जाधव, नंदा गायकवाड, अपर्णा थेटे व इतर अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होते. यावेळी अभिजीत शिंदे यांच्या ऑर्करेस्टा ग्रुपने देशभक्ती गीत सादर केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यां
नी केले.
What's Your Reaction?