छत्रपती संभाजीनगर विभाग, जिल्हा, तालूका नामकरण बोर्डाचे उद्घाटनाला आक्षेप

 0
छत्रपती संभाजीनगर विभाग, जिल्हा, तालूका नामकरण बोर्डाचे उद्घाटनाला आक्षेप

छत्रपती संभाजीनगर विभाग,जिल्हा,तालूका नामकरण बोर्डाचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन...

उच्च न्यायालयात नामांतर करणार नसल्याचे म्हटल्यावर मग हा घाट कशासाठी... याचिकाकर्ते हिशाम उस्मानी यांचा बोर्डाच्या उद्घाटनाला आक्षेप... सकाळी 10.55 वाजता होणार नामकरण बोर्डाचे उद्घाटन...?

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) उच्च न्यायालयात सरकारने औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालूका नामांतर करणार नसल्याचे शपथपत्र सादर केले आहे. सरकारचे अधिवक्ता यांनी विभाग, जिल्हा, तालूका नामकरणबाबत निर्णय घेतला नसल्याचे न्यायालयात सांगितले. शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर नोटीफिकेशन केंद्र सरकारने काढलेले आहे. शहराच्या नामांतरावर 4 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरात आलेले आहे त्यांचा दौरा कार्यक्रम बघितले असता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे स्मार्टसिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर जिल्हा, विभाग, तालूका नामकरण बोर्डाचे उद्घाटन करणार असल्याचे सरकारी दौरा कार्यक्रमात उल्लेख असल्याने धक्का बसला अशी माहिती डि-24 न्यूजला औरंगाबाद नामांतर विरोधी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले अजून नामांतरावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. पुढे होणारी सुनावणी फक्त औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत होणार आहे. या बोर्डाच्या उद्घाटनाला आमचा आक्षेप आहे सरकार बेकायदेशीर काम करत आहे. सर्वोच्च व जवाबदार पदावर बसलेलेच कायदा मोडत असतील तर याला काय म्हणावे. या प्रकाराचा याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी निषेध केला आहे. सत्ता असली म्हणजे निर्णय लादायचे नसतात त्याबद्दल जनतेचे मत व आक्षेप न मांगवता निर्णय सरकारने थोपवू नये आम्ही हे सहन करणार नाही. शहराच्या नामांतरावर आता न्यायालयीन लढाई सुरू लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा व तालुका नामांतराबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे मग हा घाट कशासाठी. याचा परिणाम न्यायालयिन कामावर पडणार नाही का...? न्यायालयाचा हा अपमान नाही का...? येणा-या निवडणुकांसाटी हे राजकारण तर नाही ना अशी शंका आमच्या मनात आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे. सरकारने कोणाच्या भावना दुखावल्यासारखे करु नये. न्यायालय जो निर्णय घेईल तो सर्वमान्य असेल पण हा संभ्रम कशासाठी हे सरकारने स्पष्ट करावे हि मागणी मोहंमद हिशाम उस्मानी यांनी केली आहे.

सोशलमिडीयावर सुध्दा त्यांनी कडक शब्दात निषेध व विरोध दर्शवला आहे. या प्रकारामुळे शहरात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow