आदर्शचे ठेविदार मोर्चात अक्रामक, इम्तियाज जलिल यांनाही रोखण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलक संतप्त...

 0
आदर्शचे ठेविदार मोर्चात अक्रामक, इम्तियाज जलिल यांनाही रोखण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलक संतप्त...

आदर्शचे ठेविदार अक्रामक, पोलिस मोर्चेकरीमध्ये रेटारेटी, इम्तियाज जलिल संतापले...!

ठेवीदारांचे पैसे आरोपिंची मालमत्ता विकून परत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली गवाही... कष्टकरी, जेष्ठ नागरिक व सर्व गुंतवणूकदारांचे मिळणार पैसे...

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) आदर्शच्या ठेवीदारांचा खासदार इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्वाखाली भडकलगेट येथून मोर्चा काढण्यासाठी ठेविदार बारा वाजेपासून जमा झाले होते. पोलिसांनी मंत्रीमंडळ बैठकीच्या स्थानी मोर्चा नेण्यास परवानगी नाकारली असता इम्तियाज जलिल व खातेदार अक्रामक झाले. अगोदर इम्तियाज जलिल यांचे भाषण झाले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ द्या त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचा पवित्रा खासदारांनी घेतला. अक्रामक होत मोर्चेकरी कुच करु लागले सुरक्षेसाठी लावण्यात बेरीकेट तोडून मंत्रीमंडळ बैठकीस्थानी जाण्याचा प्रयत्न मोर्चेक-यांनी केला तरीही एका बाजून रस्ता काढत खासदार इम्तियाज जलिल पुढे गेले. ज्या ठेवीदारांचे लाखो रुपये आपल्या खात्यात या आदर्श पतसंस्थेत अडकलेले आहेत ते हवालदील झाले आहे याप्रसंगी दोन जणांनी पोलिस बंदोबस्तातील दोरीला फासी घेण्याचा प्रयत्न केला असल्याची तेथे चर्चा सुरू होती. पोलिसांच्या सतर्कतेने हि घटना टळली. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची व रेटारेटी झाली तेथे काही काळ तनाव निर्माण झाला होता. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी आपली कागदपत्रे सोबत घेत ठेविदार मोर्चात सहभागी झाले. यामध्ये महीला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला तरीही मोर्चेकरी संतप्त झाले होते. गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठी उगारली. यामध्ये गर्दीत जेष्ठ नागरिक रस्त्यावर पडले. लाठी लागल्याचा आरोप बंदोबस्तात तैनात पोलिसांवर केल्याने परत खासदार भडकलगेट येथे आले. एकाही मोर्चेकराला हात लावायचा नाही. लाठी मारायची नाही म्हणत खासदार जलिल संतापले. सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक निर्मला परदेसी व पोलीस अधिकारी यांनी खासदार व मोर्चेक-यांची समजून काढली. पोलिसांनी जलिल यांनाही अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी झटापट झाली. 

सभास्थळी आपल्या भाषणात मंत्रीमंडळातील एकही मंत्र्यांना वेळ नाही आमची मागणी ऐकण्यासाठी. निवडणूक आली की सर्व राजकीय पक्षातील पुढारी घरोघरी मतांसाठी चकरा मारतात पण निवडणूक संपली तर अडचणीत उभे राहत नाही. एक एक पैसा ठेवीदारांचा मी मिळवून देणार असल्याचे ठोस आश्वासन जलिल यांनी आपल्या भाषणात दिले. आपल्या भाषणात ते म्हणाले शासनाने या महाघोटाळ्यातील फरार आरोपींना सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचा-यांना अटक करण्याचे आदेश निर्गमित करावे. एकही गुंतवणूकदाराचा आता जीव जाणार नाही गेला तर उपनिबंधक कार्यालयात शव आणले जाईल. जे गुंतवणूकदार मरण पावले त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत सरकारने करावी. जे आजारी पडत आहे त्यांचा मोफत उपचार शासनाने करावा जोपर्यंत पैसे मिळत नाही. अशी मागणी यावेळी खासदारांनी केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गवाहि दिली की सर्व ठेविदारांचे पैसे आरोपिंच्या मालमत्ता विकून दिली जाणार असल्याचे सांगितले. 

मंत्री गिरीश महाजन व मंत्री दिलिप वळसे पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. इम्तियाज जलिल यांना ठोस आश्वासन दिले ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी दोषींना सोडणार नाही.

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे यासाठी खासदार इम्तियाज जलिल आंदोलन करत प्रयत्न करत आहे. आज आंदोलन तीव्र झाले होते. आदर्श पतसंस्थेमध्ये 54128 ठेविदारांच्या एकुण 353.58 कोटी रुपयांच्या ठेवी असून यामध्ये 25 हजार रुपये पर्यंत ठेविदारांची संख्या 36731 इतकी आहे. या घोटाळ्यातील चेअरमन व काही संचालक अटक आहे तर काही फरार झालेले आहे. चार ऑडीटरला जामिन मिळाला आहे. संचालक मंडळाने संगनमत करून पोटनियमात तरतूद नसताना विविध संस्थांचे नावे आपसात विनातारण कर्ज देऊन दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अंबादास मानकापे यांच्या सह 50 जणांवर सिडको पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. या पतसंस्थेवर आरबीआयने निर्बंध आणले आहे. त्यामुळे खात्यातून रक्कम काढता येत नाही व पूर्वकल्पना दिल्याशिवाय बँकेला कर्जही वाटप करता येणार नाही. त्यामुळे हजारो खातेदारांचे पैसे अडकले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow