बाळासाहेब थोरात यांनी केला वचननामा प्रसिद्ध

 0
बाळासाहेब थोरात यांनी केला वचननामा प्रसिद्ध

पर्यटन कॅरिडोर, बाजापेठात स्वच्छतागृह, ई-बस, पर्यटन वाढीवर भर 

 मध्यचे उमेदवार बाळासाहेब पाटील थोरात यांचा वचननामा प्रसिद्ध 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) महाविकास आघाडीचे मध्यचे उमेदवार बाळासाहेब पाटील थोरात यांनी वचननामा प्रसिद्ध केला.

सुवर्णमध्य विकासाचा, आरंभ नव्या पर्वाचा, या माध्यमातून शहरातील विकासकामे करणार असलेल्याचे थोरात यांनी सांगितले.

वचननाम्यात पर्यावरण, पर्यटन विकास, संस्कार, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, इतर सुविधा-प्रकल्प-संकल्प यांच्याभर देण्यात आला. जलवाहिनी आणि जळकुंभ उभारणीला वेग, व्हर्टीकल पार्किंग, बाजारपेठामध्ये स्वच्छतागृह, मुली आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, महिला बचतगट, युवतीचे आत्मसंरक्षण शिबीर, जुन्या शहरातील वैभव कायम ठेवून नियोजनबद्ध आराखडा तयार करणार.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सिद्धार्थ उद्यानात फाउंटन वाटर शो, सलीम अली तलाव विकासकामे, लेणी विकास कामे आणि भगवान गौतम बुध्दाचे माहिती दालन, पानचक्की विकास, हनुमान टेकडी सौंदर्यकरण, मध्यवर्ती बसस्थानक सुविधायुक्त करणार.

दरवर्षी एक हजार वृक्षारोपण, नाले बंदिस्त करणार, वैद्यकीय कचरा प्रक्रिया, शासकीय शाळा व कार्यालय सौरऊर्जा प्रकल्प, हर्सूल भागात औषधी वनस्पती उद्यान, शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण प्रश्नमंजुषा आणि शिवकालीन युद्ध कलेचे धडे. मनपा शाळेत डिजिटल क्लासरूम, गणित आणि विज्ञान प्रयोगशाळा, ई बसेस, जिल्हात छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी मंदिर, शाळेत सॅनिटरी व्हेडीग मशीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) विस्तारिकरण, नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, रुग्णवाहीका, वस्तीत मोफत दवाखाने, साई केंद्र आणि मैदाने यांना सुविधा देणार, हडको टीव्ही सेंटर मैदान स्वरक्षण भिंत, खुल्या जागा विकसित करणे.

10 रुपयात शिवभोजन, झोपडपट्टी वासियांना पक्के घरे, जेष्ठासाठी सामाजिक सभागृह, नाना नानी पार्क, मनोरंजन केंद्र उभारणे आदी कामे करण्याचे वचन बाळासाहेब थोरात यांनी दिले.

तरी नागरिकांनी मशाल चिन्हाला मतदान करून सहकार्य करण्याचे आवाहन उमदेवार बाळासाहेब पाटील थोरात यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow