महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना विविध संघटनांचा पाठिंबा
 
                                महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांना विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांना मंगळवारी विविध पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा मिळाला आहे. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य, विश्वकर्मा वंशीय समाज संस्था महाराष्ट्र राज्य, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), छावा मराठा संघटना महाराष्ट्र राज्य, बहुजन समता सेना, अखिल महाराष्ट्र सुवर्णकार विकास महासंघ, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन छत्रपती संभाजी नगर व छत्रपती संभाजी नगर सार्वजनिक शिवजन्म सोहळा समिती आणि खंडेलवाल दिगंबर जैन समाजाने श्री सावे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
संघटनांच्या प्रतिनिधींनी असे मत व्यक्त केले की, गेल्या 10 वर्षांत श्री सावे यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या प्रयत्नांनी समाजात सकारात्मक बदल घडून आले असून, विविध समाजघटकांना त्यांच्या कार्यातून मोठा लाभ झाला आहे. या पाठिंब्याचा उद्देश समाजाच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ देणे आहे, असे या संघटनांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी संबंधित पक्ष, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            