तर नवीन ओबेरॉय यांचा भाजपाला पाठिंबा...? शहरात उलटसुलट चर्चा...

 0
तर नवीन ओबेरॉय यांचा भाजपाला पाठिंबा...? शहरात उलटसुलट चर्चा...

तर नवीन ओबेरॉय यांचा भाजपाला पाठिंबा...?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक नवीन ओबेरॉय हे निवडून आले आहे. ते सेक्युलर असले तरी त्यांच्या भुमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले. ते आपल्या पक्षासोबत राहतील की पक्षांतर करतील अशा उलटसुलट चर्चा शहरात सुरू झाली आहे. उद्या महापौर पदाची सोडत आहे. यानंतर महापौर बनवण्यासाठी फिल्डिंग गतीमान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाचे 57 नगरसेवक निवडून आले आहे. बहुमतासाठी एक नगरसेवक भाजपा कडे कमी आहे. महापौर पदासाठी नवीन ओबेरॉय यांनी भाजपाला साथ देण्यासाठी लाॅबिंग सुरू असल्याची त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या विरोधात एमआयएमने उमेदवार न देता अप्रत्यक्ष साथ दिली. त्यांनी सेक्युलर विचारधारा सोडून भाजपाला साथ दिली तर त्यांचे राजकारण संपेल असे वक्तव्य एका पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी केले आहे. उध्दव सेनेनेही त्यांच्या पॅनलमध्ये उभे करून साथ दिली त्यांनी भाजपाला साथ दिली तर ...असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन ओबेरॉय यांनी आपली राजकीय भुमिका स्पष्ट करावी अशी चर्चा शहरात सुरू आहे.

या निवडणुकीत 115 पैकी भाजपाला 57, एमआयएम 33, शिवसेना 12, उबाठा 6, वंचित 4, काँग्रेस 1, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 1

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow