शहरातील देशी दारूच्या दुकाने शहराबाहेर करणार, भाजपा व शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणत्याही पक्षासोबत युती - इम्तियाज जलिल

 0
शहरातील देशी दारूच्या दुकाने शहराबाहेर करणार, भाजपा व शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणत्याही पक्षासोबत युती - इम्तियाज जलिल

शहरातील देशी दारूच्या दुकाने शहराबाहेर करणार, भाजपा-शिवसेनेला रोखण्यासाठी कोणत्याही पक्षाशी युती करणार - इम्तियाज जलिल 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) - 29 महापालिका निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मुंबई सह महापौर बवण्यासाठी राजकीय पक्षांनी हलचल तीव्र झाली आहे. भाजपा व शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएम कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहे. मुंबईचा महापौर बवण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला पाठिंबा लागला तर देणार. भाजपा व शिंदे सेनेसोबत युती करणार नाही हा ठाम निर्णय घेतला आहे. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित वक्तव्य करणाऱ्यांवर युती सरकारने कार्यवाही केली नाही तर या पक्षासोबत मालेगाव येथील इस्लाम पक्ष सत्तेसाठी जाणार का...? हे बघावे लागेल असे उत्तर पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 33 नगरसेवक मतदारांनी निवडून दिले. महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिकेत राहणार आहे. पहीलाच ठराव शहरातील सर्व देशी दारूच्या दुकाने महापालिका क्षेत्रातून बाहेर करण्यासाठी घेतला जाणार आहे. सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष सर्वांनी हा ठराव एकमताने घेतला तर पाठिंबा देणार. हर्सुल येथील कचरा डेपो हटविणे, हाॅकर्स झोन, पिण्याचे पाण्याचा प्रश्न मिटवणे याला प्राथमिकता दिली जाईल. जास्त संख्या नवख्या नगरसेवकांची निवडून आल्याने सभागृहात कामकाज कसे चालते याची ट्रेनिंग आज देण्यात आली आहे. शहराच्या विकासासाठी रोड मॅप तयार केला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत इम्तियाज जलिल यांनी दिली.

महानगरपालिका निवडणुकीत 33 नगरसेवक निवडून आणत एमआयएम पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा ठरला. निवडणुकीपुर्वी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या दिशेने पाऊले टाकण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शहराला नशेखोरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सर्व देशी दारूची दुकाने ही शहरा बाहेर हटवण्याचा ठराव महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत आणणार असल्याचे इम्तियाज यांनी जाहीर केले.

निवडणुका संपल्या आहेत, निकाल जाहीर झालेला आहे. त्यामुळे प्रचारात एकमेकांवर केलेले आरोप, टीका, चिखलफेक विसरून आता शहराच्या विकासासाठी एकत्र या. महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत जो ठराव एमआयएमचे नगरसेवक आणणार आहेत, त्याला भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व 115 नगरसेवकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले.

एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा एकमेकांचा परिचय आणि त्यांना महापालिकेतील कामकाजाची थोडक्यात माहिती व्हावी, या संदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण पक्षाच्या वतीने देण्यात आले. यावेळी इम्तियाज जलील यांनी एमआयएम कोणत्या मुद्यांवर महापालिकेत जोर देणार आहे, याची माहिती माध्यमांना दिली. 33 पैकी 17 नगसेवक या महिला आहेत. त्यामुळे आमच्या पक्षावर महिलांना पुढे येऊ देत नाही, असा आरोप करणाऱ्यांना हे उत्तर आहे.

महापालिका निवडणुकीच्या आधी आम्ही शहरात काही मुद्दे घेऊन होर्डिंग्ज लावले होते. यात प्रामुख्याने नशेखोरी रोखण्यासाठी शहरातील दारुची दुकाने शहराबाहेर हलवणे, जितके दिवस पाणी, तितकीच पाणीपट्टी महापालिकेने आकारावी याचा समावेश होता. पाणी प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे, योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याने शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे. 

परंतु शहरातील दारूची दुकाने बाहेर हलवण्या संदर्भात आम्ही पहिल्याच जनरल बाॅडी मिटिंगमध्ये ठराव आणणार आहोत. दारु दुकाने हलवण्यात कायदेशीर अडचणी सांगितल्या जात होत्या. परंतु आम्ही या संदर्भात सखोल माहिती आणि चौकशी केल्यानंतर शहरवासियांचे प्रतिनिधित्व महापालिकेत करणाऱ्या 115 नगरसेवकांना सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन हा निर्णय घेता येऊ शकतो. 

माझी सत्ताधारी व विरोधातील सर्वच पक्षांना विनंती आहे, की त्यांनी या ठरावाला आपला पाठिंबा देऊन एक चांगला संदेश राज्यातच नाही तर देशात पोहचवावा, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले. वेगवेगळे पक्ष, विचारसरणी असली तरी शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येवून काम करावे. विकास हाच आपला अजेंडा असला पाहिजे, अशी अपेक्षा इम्तियाज यांनी यावेळी व्यक्त केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow