ईव्हीएमवर चंद्रकांत खैरे यांचा घणाघात, बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची मागणी

 0
ईव्हीएमवर चंद्रकांत खैरे यांचा घणाघात, बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची मागणी

उध्दव ठाकरे गटाचा ईव्हीएमला विरोध, ईव्हीएमला विरोध करणा-या उपोषणाला खैरेंचा पाठिंबा, पराभवाचे खापर फोडले ईव्हीएमवर...

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) मागिल आठ दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ईव्हीएमला विरोध व बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे यांचे उपोषण सुरु आहे.

आज या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उध्दव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

त्यांनी भवरे यांची मागणी बरोबर असल्याचे म्हणत शिवसेनेचा ईव्हीएमला विरोध आहे. सॅटेलाईटने ईव्हीएम कंट्रोल केले जात असल्याचा अजब आरोप भाजपावर लावला आहे. उध्दव ठाकरे यांनी सुध्दा इंडिया आघाडीच्या बैठकीत ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपर वर निवडणुका घेतले जात आहे मग भारतात का घेतले जात नाही. निवडणूक आयोग मोदींच्या मुठीत आहे असा गंभीर आरोप करत त्यांनी सांगितले तेलंगणा येथे भाजपाची ताकत नव्हती म्हणून तेथे गडबडी न करता जिंकलेल्या तीन राज्यांत सॅटेलाईटने ईव्हीएमध्ये गडबडी केल्याचा आरोप केला आहे. मागिल उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुध्दा गडबड केली होती. तेथे 13 विधानसभा मतदारसंघात 70 टक्के मुस्लिम मते असताना भाजपाचा उमेदवार निवडून येतो मुस्लिम उमेदवार पडतो. भाजपाचे नेते किरीट सोमय्या या या विषयावर संशोधन केले ते आता गप्प का...? ईव्हीएमच्या विषयावर ते का बोलत नाही. नागपूर मध्ये एकदा गेलो तेथील काही लोकांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली होती. वार रुम मधून मतदान केंद्रात कोण कोणाला मतदान केले असे सॅटेलाईटने कळते असा अजब दावा चंद्रकांत खैरे यांनी केल्याने आता ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा तापणार असे दिसत आहे. तीन राज्यांत भाजपाला यश मिळाले तरी लोकसभा निवडणुकीत पराभव होईल असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला आहे. 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ईव्हीएम विरोधात मुद्दा उपस्थित होणार असल्याची माहिती खैरे यांनी यावेळी दिली आहे. विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांनी राष्ट्रपती व निवडणूक आयोगाला पत्र देण्याची विनंती केली आहे. इंडिया आघाडी यामुळे आणखी मजबूत होईल व झालेल्या पराभवाबाबत आत्मचिंतन करुन नवीन उत्साहाने जनतेमध्ये जाऊन आणखी जोमाने काम करु. ईव्हीएमला बंदी भाजपा आणणार नाही तर कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत सतर्क राहावे असा इशारा दिला आहे. सर्व यंत्रणेवर कंट्रोल करुन भाजपा आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप खैरेंनी केला आहे. लोकसभेनंतर होणा-या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल व उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, शेख रब्बानी, हिदायत खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow