मिलिटरी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी रंगवल्या पोलिस अधिक्षक कार्यालय पाळणाघराच्या भिंती...

डेक्कन मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रंगवल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील पाळणाघराच्या भिंती....
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)
डेक्कन मिलिटरी स्कूलच्या वर्ग पाचवी ते आठवीतील 22 विद्यार्थ्यांनी मिळून पोलीस अधीक्षक कार्यालयातील लहान मुलांचे पाळणा घराच्या भिंती रंगवल्या. वय वर्ष एक ते सहा वर्षातील मुलांना चित्राची भाषा समजते चित्राचे आकर्षण त्यांना असते ही गोष्ट समोर ठेवून विविध विषयाचे चित्र विद्यार्थ्यांनी भिंतीवर रेखाटले. वेगवेगळ्या चित्रामुळे रंगांमुळे ते पाळणाखळ जणू काही बोलायला लागले. अधीक्षक कार्यालयाच्या अन्नपूर्णा सिंह आयपीएस अपर पोलीस अधीक्षक मॅडमच्या कल्पनेतून शाळकरी मुलांना भिंत रंगवण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सरला गाडेकर असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मॅडम यांनी ही कल्पना मुलांच्या माध्यमातून पूर्ण करायचे ठरवले.
आणि डेक्कन मिलिटरी स्कूलच्या 22 विद्यार्थ्यांनी मिळून ही कल्पना एका दिवसात पूर्ण केली. यासाठी संस्थेचे संस्थापक मनीष पाटील आणि किशोर पाटील यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर प्राचार्य सरोज भालेराव, कॉर्डिनेटर सृष्टी देशमुख, कलाशिक्षिका अश्विनी कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वेल्फेअर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, भरोसा सेलचे अंमलदार पारवे पवार, साळुंके मालकर यांचे देखील सहकार्य लाभले. सदर वेळी प्रभारी पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, आयपिएस मॅडम यांनी मुलांसोबत संवाद साधून कौतुक केले व मार्गदर्शन देखील केले.
What's Your Reaction?






