पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची पोलिस आयुक्तांना मागणी

 0
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची पोलिस आयुक्तांना मागणी

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांना कडक शासन करून पत्रकारांना पोलिस संरक्षण द्या

आंबेडकरवादी बहुजन विकास समितीची पोलीस आयुक्ताकडे मागणी...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)

 आज सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त प्रविण पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटुन काल पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध करुन निवेदन देण्यात आले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपल्या जिवाची बाजी लावून पत्रकार बंधु हे सत्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करीत असतात.

गोरगरीबांवर वंचीत बहुजन कष्टकरी कामगारांचा आवाज बुलंद करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या वृत्तपत्र चॅनलच्या माध्यमातून प्रसिध्दी देवून त्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो.

परंतू काल काही गावगुंडांची वसंतराव नाईक कॉलेज समोर जालना रस्त्यावर हाणामारी सूरू होती. त्यांच्या जवळ तीक्ष हत्यारे होती आणि या भांडणांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी रस्त्यावर झाली होती. नामांकित दैनिकाचे पत्रकार अजय हरने यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हा प्रकार प्रशासनासमोर यावा म्हणून आपल्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढण्यास सुरूवात केली हे त्या टोळक्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पत्रकार हरने यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. व त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे. परंतु एका पत्रकारावर भररस्त्यात अशा प्रकारे भ्याड हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे. यामुळे आपल्या शहरात कायद्याचे राज्य आहे. हे या टवाळखोरांना दाखवून देण्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व नोंदणीकृत पत्रकारांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे दिला आहे. यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे, अमित वाहुळ, मोहनमामा म्हस्के, सचिन जोगदंडे, संतोष चव्हाण, कमलेश नरवडे, नागेश केदार व ईतर कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow