दोन वकीलांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल, वकील संघाच्या वतीने निषेध
दोन वकीलांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल, वकील संघाच्या वतीने निषेध
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) जिल्हा वकील संघाचे सभासद अॅड सिध्दार्थ काशिनाथ बनसोडे, अॅड किशोर उत्तमदास वैष्णव यांना सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शिवाजी ताठे यांनी बेकायदेशीर रित्या ताब्यात घेऊन चुकीचा गुन्हा नोंदवून त्यांची बदनामी करण्यात आली या घटनेचा जिल्हा वकील संघाने आज निषेध केला.
या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा वकील संघाने व पैठण वकील संघाने लाल फिती लावून या घटनेचा निषेध करत न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला. सदरील घटनेमध्ये सर्व वकीलांनी पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी सदरील वकिलांची माफी मागितली नाही तसेच त्यांच्या विरोधात नोंदवलेला गुन्हा मागे घेतला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. सर्व जिल्ह्यातील सर्व वकील संघ कामकाज बंद करून कायदेशीर पध्दतीने निषेध दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सर्व विविज्ञ रस्त्यावर उतरून पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन निवेदन देणार असल्याचा ठराव सर्व वकिलांनी मांडला व त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे ठरले. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड मिलिंद पाटील, सचिव अॅड तिर्थराज चावरे, उपाध्यक्ष अॅड सुनील पडुल, सहसचिव अॅड करण गायकवाड, सदस्य अॅड राहुल जमधडे, जेष्ठ विविज्ञ अॅड बरलोटा, अॅड कुलकर्णी, अॅड अभय टाकसाळ, अॅड निकम, अॅड निकम, अॅड जाधव, अॅड घोरपडे, अॅड घोरपडे, अॅड नवाब पटेल, अॅड सोरमारे, अॅड गायकवाड, अॅड आमराव, अॅड संभाजी तवार, अॅड झे.के.नारायणे, अॅड पगारे, अॅड आवारे, अॅड अमोल घोडेराव, अॅड विलास वाघ, अॅड तायडे तसेच ज्यांच्या बाबतीत हि घटना घडली ते अॅड किशोर वैष्णव व अॅड सिध्दार्थ बनसोडे व ज्युनिअर वकीलांची उपस्थीती होती.
What's Your Reaction?