गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शेवटच्या चार दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शेवटच्या चार दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी...
शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा श्री गणेश महासंघाच्या मागणीला यश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) - गणेशोत्सवाच्या शेवटच्या चार दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी गणेश महासंघाच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला यश मिळाले असून जिल्हा प्रशासनाचे श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी आभार मानले आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी ही मागणी मान्य करून दिनांक 3 सप्टेंबर पासून ते श्री. विसर्जन 6 सप्टेंबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरातील श्री गणेश भक्तांमध्ये आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे. या वेळी लक्ष्मीनारायण राठी, प्रभात पुरवार, अनिकेत तांदळे, सुनील अग्रवाल व विक्की जाधव उपस्थित होते.
What's Your Reaction?






