नमो दहिहंडी उत्सवात मराठी सिनेतारकांची उपस्थिती राहणार - मंत्री अतुल सावे
मराठी सिनेतारकांच्या उपस्थित होणार नमो दहीहंडी...
गो...गो...गो...गोविंदा..! सिडको, पुंडलिक नगरमध्ये रंगणार दहीहंडीचा थरार
श्रेया बुगडे आणि सोनाली सोनार यांची प्रमुख उपस्थिती
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.26(डि-24 न्यूज) दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पूर्व मतदार संघाचे आमदार श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली नमो दहीहंडी चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलावंत हजेरी लावणार आहेत.
मंगळवारी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. बाळ गोपाळ आणि युवकांचे उत्साह वाढवण्यासाठी चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे आणि तू भेटशी नव्यानेची अभिनेत्री शिवानी सोनार यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. मागील 10 वर्षा पासून राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली पूर्व मतदार संघात दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे हे 11 वे वर्ष असून पुंडलिक नगर येथील पटियाला बँक जवळ तर सिडको मधील बजरंग चौक येथे नमो दहीहंडी आयोजित करण्यात येते.
थरांची स्पर्धा, बाळ गोपाळांचा जल्लोष असा माहोल दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गोविंदांना गौरवण्यात येणार आहे. यासोबत या दहीहंडी उत्सवाला कलाकार आणि राजकीय नेते देखील भेट देणार असल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते पुंडलिक नगर आणि बजरंग चौक येथील मुख्य मंच चे स्तंभ पूजन करण्यात आले.
What's Your Reaction?