पश्चिम मतदारसंघात पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल, इसमाविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल
निवडणुकी दरम्यान मतदारांना पैशाचे प्रलोभन दिल्याबद्दल औरंगाबाद पश्चिम मध्ये अज्ञात इसमाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 19(डि-24 न्यूज) औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ निवडणूक दरम्यान मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखवत असताना तसेच एक इसम पाचशे रुपयेच्या नोटा देत असतानाचा एक व्हिडिओ औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आचार संहिता भरारी पथक प्रमुख सत्यनारायण कणकय्या मुराडी यांना अनोळखी मोबाईल नंबरवरून सकाळी 11.52 वाजता फोन आला की भरारी पथक यांनी देवळाई तांडा येथे यावे त्यानुसार आचार संहिता भरारी पथक क्र. 7 मधील पथकप्रमुख सत्यनारायण कणकय्या, पोलीस कर्मचारी गणेश जाधव 1567, गायकवाड, वाहन चालक सुनील खरात, तसेच व्हिडिओग्राफर प्रथम पवार हे सर्व 12.07 वाजता देवळाई तांडा येथे पोहचले त्यावेवेळी तेथे सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ताठे आणि भरारी पथक क्र 1 पथक प्रमुख श्री जाधव आणि पथक सदस्य हजर होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक ताठे यांनी त्यांच्या मोबाईल मधील निवडणूक दरम्यान पैसे वाटत असतानाचा व्हिडिओ दाखवला असता औरंगाबाद पश्चिमचे आचार संहिता भरारी पथक घटनास्थळाची शहानिशा करण्यासाठी गेले असता घटनास्थळावर सदरील व्हिडिओ मधील कोणताही व्यक्ती आढळून आली नाही. आमच्या आचारसंहिता पथकाने सदरील व्हिडिओचे बारकाईने अवलोकन केले असता आणि त्याबाबत माहिती घेतली असता व्हिडिओ मधील व्यक्ती कोण आहेत याचा बोध आमच्या पथकास झाला नाही तसेच एक इसम व्हिडिओमध्ये रुपये पाचशेच्या नोटा देत असताना व उर्वरित मतदान झाल्यानंतर देण्यात येईल असे बोलत असताना आढळून आला. यासंदर्भात दिनांक 19 11 2024 रोजी एक अनोळखी इसम निवडणुकीदरम्यान मतदारांना पैशाचे प्रलोभन देत असताना व्हिडिओमध्ये दिसून येत असल्याने आचारसंहिता भरारी पथक क्रमांक सातचे पथक प्रमुख सत्यनारायण कणकय्या मुराडी यांनी अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 171, 173 अन्वये चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पुढील पोलीस तपास चालू आहे अशी माहिती औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री उमाकांत पारधी यांनी दिली.
What's Your Reaction?