पूर्व मधून काँग्रेसचे एम.के.देशमुख, डॉ.कादरींचा पत्ता कट, मुस्लिम समाजात नाराजी, इम्तियाज जलील उतरणार मैदानात...?
पूर्व मधून अखेर एम.के.देशमुख यांना उमेदवारी, डॉ.गफ्फार कादरी यांचा पत्ता कट, मुस्लिम समाजात नाराजी...!
मुस्लिम उमेदवार दिला नसल्याने एमआयएमचा फायदा होईल, मुस्लिम मते तिकडे वळतील अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.... इम्तियाज जलील होते वेट अँड वाटच्या भुमिकेत आता काँग्रेसचा उमेदवार ठरल्याने ते या मतदारसंघातून उडी घेणार असल्याचे अधिकृत सुत्रांनी माहिती दिली आहे...या मतदारसंघात काटे की टक्कर बघायला मिळणार आहे...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून अखेर मधुकर कृष्णराव देशमुख(एम.के.देशमुख) यांना उमेदवारी दिली आहे. आज जाहीर झालेल्या 23 उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव आहे. मुस्लिम नेत्याला तिकीट दिले जाईल वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला होता परंतु अखेरीस मराठा उमेदवार या मतदारसंघातून दिल्याने मुस्लिम मते एमआयएम कडे वळतील अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी दिली जाईल असे आश्वासन दिले होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, डॉ.जफर अहेमद खान, डॉ.सरताज पठाण यांच्याही नावाची चर्चा होती परंतु पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा मुस्लिम समाजाचा हिरमोड केल्याने नाराजी पसरली आहे. हि नाराजी काँग्रेस कशी दूर करणार हे बघावे लागेल डॉ.गफ्फार कादरी आता काय करतील त्यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून आता इम्तियाज जलील उभे राहणार निश्चित झाले आहे. अशी चर्चा एमआयएमच्या गोटात आहे.
प्रदेश सरचिटणीस तथा इच्छुक असलेले डॉ.जफर अहेमद खान यांनी सांगितले शेवटपर्यंत काँग्रेसने मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे सांगितले तीन मुस्लिम नेत्यांचे नावे आघाडीवर होते त्यापैकी एकालाही तिकीट दिले नसल्याने मुस्लिम समाजात नाराजी आहे. जेवढे प्रतिनिधित्व राज्यात द्यायला हवे होते ते मिळाले नाही. मोजक्या ठिकाणी पक्षाने तिकीट दिल्याने नाराजी असल्याने पक्षाला फटका बसू शकतो. एमएलसी पण काँग्रेसने दिली नसल्याने नाराजी आहे असे त्यांनी सांगितले.
जालना येथून पुन्हा कैलास गोरंट्याल, भुसावळ (एससी) डॉ.राजेश तुकाराम मानवतकर, जळगाव जामोद डॉ.श्रीमती स्वाती संदीप वाकेकर, अकोट महेश गंगाणे, वर्धा शेखर प्रमोदभाऊ शिंदे, सावनेर श्रीमती अनुजा सुनील केदार, नागपूर साऊथ गिरीश कृष्णराव पांडव, कामठी सुरेश यादवराव भोयर, बांद्रा(एससी) श्रीमती पुजा गणेश थावकर, अर्जुनी मोरगाव(एससी) दिलीप वामन बनसोड, आमगाव(एसटी) राजकुमार लोटुजी पुरम, रालेगाव प्रो.वसंत चिंदुजी पुर्के, यवतमाळ अनिल (बाळासाहेब) शंकरराव मंगुलकर, अरनी(एसटी) जितेंद्र शिवाजीराव मोघे, उमरखेड(एससी) साहेबराव दत्तात्रय कांबळे, जालना कैलास किसनराव गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मधुकर किसनराव देशमुख(सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी) वसई विजय गोविंद पाटील, कांदीवली पूर्व कालू बधेलिया, चारकोप यशवंत जयप्रकाश सिंग, सायन कोळीवाडा गणेशकुमार यादव, श्रीरामपूर(एससी) हेमंत उगले, निलंगा अभयकुमार सतीशराव साळुंके, शिरोळी गणपतराव अप्पासाहेब पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
What's Your Reaction?