जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

20 नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून मतदान करावे व लोकशाही बळकट करावी - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके....

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)

20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी सुविधा उपलब्ध केले आहे. प्रत्येक मतदारांनी घराबाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. जेष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी जिल्ह्यातील 9 मतदारसंघात ऑटोरिक्षा व विविध वाहनांची व व्हिलचेअरची, पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रशासनाने केली आहे. पारदर्शक मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात ३२७३ मतदान केंद्र असून शहरी भागात १२९० तर ग्रामीणमध्ये १९८३. 

संवेदनशील मतदान केंद्र ४० असून सहाय्यकारी मतदान केंद्र ९ आहेत. 

जिल्ह्यात या निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व नऊ मतदार संघ मिळून एकूण ३९७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. २१४ उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्या नंतर एकूण १८३ उमेदवार सध्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात पाच निवडणूक निरीक्षक भारत निवडणूक आयोगामार्फत नियुक्त करण्यात आले आहेत.

 जिल्ह्यात मतदारांची संख्या ३२ लाख २७ हजार ५१ असून त्यात पुरुष मतदार १६ लाख ६३ हजार १८६, स्त्री मतदार १५ लाख ३९ हजार ४२१ व इतर मतदार १४४ आहेत, दिव्यांग मतदार २७ हजार ९६४, सेवा मतदार २५०८आहेत.

निवडणूक प्रक्रियेसाठी १५९६ वाहन तैनात केले असून ३७४ बसेस, १५० ऑटो ( दिव्यांग व ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदारांसाठी ) 

 निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचारी १८ हजार १७८ असून त्यात १० हजार ९७८ पुरुष तर ७२०० महिला कर्मचारी आहेत. पोलीस आयुक्त कार्यक्षेत्र हद्दीतील पोलीस बंदोबस्तामध्ये १२३ पोलीस अधिकारी तर १८२६ पोलीस कर्मचारी आहेत. तसेच एस आर पी एफ, बी एस एफ, सी आर पी एफ, आर पी एफ असे २६९३ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या ग्रामीण भागातील कार्यक्षेत्रात मध्ये १३७ अधिकारी तर २२९१ कर्मचारी आहेत असे जिल्ह्याभरात एकून ६६२१ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 

आचारसंहिता कक्षा अंतर्गत विविध पथकांमार्फत ३ लाख ३७ हजार ५०६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून २९ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सी व्हिजील ॲपद्वारे नागरिकांनी २९४ तक्रारी दाखल केल्या त्यापैकी २६९ तक्रारी ह्या शंभर मिनिटांच्या आत निकाली काढण्यात आल्या. लेखी प्राप्त झालेल्या २३ तक्रारींचा निपटारा पूर्णपणे करण्यात आला आहे. 

गृह मतदानासाठी ४७१४ अर्ज प्राप्त होते त्यापैकी ४०७१ जणांनी मतदान केले आहे. गृह मतदानासाठी १४० टीम तयार करण्यात आल्या होत्या तसेच १४२ सूक्ष्मनिरीक्षकांची नियुक्ती केली १४९ वाहने वापरण्यात आली. टपाली मतदान १३३४१ असून त्यापैकी ९६९९ मतदान झाले. सैन्य दलातील २५०८ मतदान आहे. 

प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा आणि सेवा उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये शहरी भागांमध्ये ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे तर १९६ इतर स्टाफ ची नियुक्ती यामध्ये करण्यात आली आहे तर ग्रामीण स्तरांमध्ये २९५ वैद्यकीय अधिकारी आणि २०३७ आहे एकूण ३५१ वैद्यकीय अधिकाऱ्यांची व ३००३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारासाठी १५१० व्हीलचेअरची उपलब्धता निवडणूक विभागामार्फत करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow