विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान, सर्वांना मतदान करण्याचे केले आवाहन
 
                                विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे बजावला मतदानाचा हक्क
लोकशाही अधिक समृद्ध करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.18(डि-24 न्यूज) लोकशाही अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने येत्या २० नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.
शासकीय तंत्रनिकेतन येथील टपाली मतदान सुविधा केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर श्री. गावडे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
आयुक्त श्री. गावडे म्हणाले, मी टपाली मतपत्रिकेद्वारे आज मतदान केले आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी कर्मचारी यांनी आपले मतदान टपाली मतपत्रिकेद्वारे करावे तसेच इतर मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            