प्रदेश तेली महासंघाचे प्रदीप जैस्वाल यांना पाठिंबा
प्रदेश तेली महासंघाचा प्रदीप जैस्वाल यांना जाहीर पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र राज्य प्रदेश तेली महासंघाने आज मध्य मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महासंघाच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे प्रदीप जैस्वाल यांना आगामी विधानसभा निवडणुकीत अतिरिक्त पाठिंबा आणि सहकार्य मिळणार आहे.
आज तेली महासंघाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन प्रदीप जैस्वाल यांना त्यांच्या उमेदवारीसाठी सार्वजनिक पाठिंबा जाहीर केला. हे पाठिंबा पत्र ऋषिकेश जैस्वाल यांना देण्यात आले. याद्वारे तेली समाजाने त्यांना आपला सहकार्य व विश्वास दिला आहे. महासंघाच्या या निर्णयावर बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, "प्रदीप जैस्वाल हे एक सक्षम आणि ईमानदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य मतदारसंघाचा विकास होईल, अशी आमची खात्री आहे. तेली समाजाच्या हिताचे रक्षण आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रदीप जैस्वाल यांच्या उमेदवारीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे." त्यांच्या या वक्तव्यानंतर ऋषिकेश जैस्वाल यांनी महासंघाचे आभार मानले आणि तेली समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे प्रदीप जैस्वाल हे काम करतील. असे त्यांच्या वतीने आश्वासन दिले
What's Your Reaction?