पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती टक्केवारी वाचा या बातमीत

 0
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती टक्केवारी वाचा या बातमीत

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 55.73 टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23 (डि-24 न्यूज)-05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक-2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 55.73 टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील 217 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 93 हजार 318 मतदार आहेत. यामध्ये 66 हजार 385 पुरुष, 26 हजार 928 महिला आणि 5 इतर मतदारांचा समावेश आहे.

सायंकाळी 4 वाजेपर्यंत 39 हजार 270 पुरुष आणि 12 हजार 737 महिला मतदारअशा एकूण 52 हजार 7 मतदारांनी मतदान केले. त्यानुसार पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी 59.15, महिला मतदारांची 47.30, तर एकूण मतदानाची टक्केवारी 55.73 इतकी नोंदविण्यात आली, अशी अंतरिम आकडेवारी जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow