सिमेंट रस्त्यावरील व चौकातील अवैध पार्कींग बंद करुन रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी
सिमेंट रस्त्यावरील व चौकातील अवैध पार्कींग बंद करुन रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी...
रोशन गेट ते आझाद चौक, कटकट गेट ते पोलिस मेस सिमेंट रस्त्यावरील अवैध पार्कींग हटवण्याची मागणी...
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज)
शहरातील सिमेंट रस्त्यावर व चौकात जागोजागी टु-व्हिलर, फोर व्हीलर उभ्या असल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे. अवैध पार्कींग शहरात मोठ्या प्रमाणात झाले असल्याने रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे अपघात घडत आहेत. या रस्त्यावर ऑटोरिक्षा चालवणे कठीण झाले आहे यासाठी पोलिस आयुक्त व मनपा आयुक्त यांना रिक्षाचालक मालक महासंघाने निवेदनाद्वारे विनंती केली आहे की हि अवैध पार्कींग बंद करण्याची कारवाई करावी.
रिक्षातथांबे, पिक अप पाॅईंट निश्चित करण्यात यावे, शहरातील विविध मार्गांवर खड्डे पडले आहेत ते दुरुस्त करावे.
शहाबाजार ते चंपाचौक, मंजूरपूरा, जूना बाजार, बुढीलेन, मनपा कार्यालय ते टाऊनहाॅल उड्डाणपूल, सिटीक्लब ते जामा मस्जिद नेहरु भवन , ईरम मेडीकल, जूना बाजार, औरंगपुरा पिया मार्केट या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी निसार अहमद खान यांनी केली आहे.
What's Your Reaction?