परभणीची हिंसा थांबवा... संविधानाची विटंबना करणा-या आरोपिला कठोर शिक्षा द्या - वंचित

 0
परभणीची हिंसा थांबवा... संविधानाची विटंबना करणा-या आरोपिला कठोर शिक्षा द्या - वंचित

परभणीची हिंसा थांबवा, संविधानाची विटंबना करणा-या आरोपिला कठोर शिक्षा द्यावी - वंचित 

 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. तेथे वातावरण चिघळले आहे तात्काळ प्रशासनाने परिस्थिती हाताळावी. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

भारतीय संविधानाचा विटंबना ही अतिशय लज्जास्पद बाब आहे. या पूर्वीही भारतीय संविधान आणि आंबेडकरी प्रतीकांचा अपमान जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी 24 तासांच्या आत तत्काळ अटक करावी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी. आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आरोपींना तत्काळ अटक करून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असे ठोस प्रयत्न करावेत ही विनंती.

अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

यावेळी वंचितचे नेते अमित भुईगळ, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, जावेद कुरैशी, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मेघानंद जाधव, सतीश शिंदे, मतीन पटेल यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow