संविधानाची विटंबना करणा-या समाजकंटकाला जन्मठेपेची शिक्षा देण्याची काँग्रेसची मागणी

 0
संविधानाची विटंबना करणा-या समाजकंटकाला जन्मठेपेची शिक्षा देण्याची काँग्रेसची मागणी

संविधानाची विटंबना करणा-या दोषीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची काँग्रेसची मागणी...

विभागीय आयुक्तांना निवेदन देवून केली मागणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)

परभणीत संविधानाची विटंबना करणा-या आरोपिवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे काँग्रेसच्या वतीने केली आहे.

 आज बुधवारी रोजी 4 वाजता विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व संविधानाची प्रत त्यांची तोडफोड करण्यात आली व संविधानाची विटंबना करण्यात आली याप्रकरणी परभणी येथील समाजकंटाकावर व दोषीवर कडक शिक्षा व व्हावी म्हणून विभागीय आयुक्त यांना औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. परभणी येथील समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान व संविधानाची प्रत तोडफोड केली म्हणून त्यांना कठोर शासन व्हावे याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आकेब रजवी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय धर्मरक्षक, रेखाताई राऊत, उत्तम दणके, रेखा मुळे, रंजनाताई कांबळे, संजय जाधव, मीनाज पटेल, रियाज पटेल, प्रा. धुळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाठ यांनी केले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow