इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव मागवले

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे...
प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.17(डि-24 न्यूज)- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी तसेच इ. 8 वी ते 10 वी प्रवर्गतील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात येत होत्या. यासंदर्भात शासनाने जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार सन 2024-25 पासून आता या योजना सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, असे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अनंत कदम यांनी कळविले आहे. तरी इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांची माहिती त्यांचे बॅंक खाते, अर्ज प्रक्रिया ही शिक्षण विभाग माध्यमिक व प्राथमिक यांच्याकडे प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती तयार करुन गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, मनपा शिक्षण विभाग यांच्या मार्फत योजनेचे प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास कल्याण छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन सहाय्यक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.
What's Your Reaction?






