घाटी रुग्णालयात माणुसकीची राखी साजरी...

शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध, साडी आणि प्रेमाची भेट
सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या 8 वर्षापासुन अविरत उपक्रम...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - :
राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ–बहिणीच्या नात्याचं प्रतीक. घरात सण साजरे होतात, गोडधोड वाटले जातात. पण ज्या बहिणी रुग्णालयात आजारी अवस्थेत आहेत, ज्यांचं कुटुंब जवळ नाही किंवा आर्थिक अडचणींमुळे त्या एकट्याच उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी हा सण केवळ आठवणीत राहतो… पण अशाच भावनिक क्षणी माणुसकी समुहाच्या 'भावंडांनी' रुग्णालयात जाऊन या बहिणींना राखी बांधत औषधी, साडी आणि प्रेमाची भेट दिली. गेल्या 8 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम यंदाही सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व ज्युनिअर चार्ली फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात घाटी रुग्णालयातील मेडिसिन बिल्डिंग मधील वॉर्ड क्रमांक 3, 4 आणि 12 येथे उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना राखी बांधून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आले. या वेळी प्रत्येक महिलेला "एक राखी, एक साडी" या उपक्रमाअंतर्गत साडी भेट देण्यात आली. तसेच काही रुग्णांना औषधासाठी 100 रु. ची आर्थिक मदतही देण्यात आली. यामुळे त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.
एक वृद्ध महिला रुग्ण, ज्यांचा भाऊ वर्षांपूर्वीच दिवंगत झाला होता, त्या म्हणाल्या –
"आम्ही आठ बहिणी… पण भाऊ गेला आणि राखी साजरी करणं थांबलं. आज भाऊ गेल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा राखी बांधली. आज जणू माणुसकीच्या रूपात भाऊ परत आलाय… ही राखी मी आयुष्यभर विसरणार नाही!"
कार्यक्रमात ज्युनिअर चार्ली फाउंडेशनचे अध्यक्ष (सोमनाथ स्वभावणे) यांनी आपल्या हास्यविनोद आणि अभिनयाच्या माध्यमातून रुग्णांना हसवलं, त्यांचं मन हलकं केलं. उपस्थित रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी याचे भरभरून कौतुक केलं.
या स्तुत्य उपक्रमासाठी समाजसेवक सुमित पंडित यांच्या नेतृत्वात माणुसकी समूहाने विशेष प्रयत्न केले.
या उपक्रमासाठी लायन्स क्लबचे संतोष पगारीया, अनील लुनीया, पुनीत गायकवाड यांनी साड्यांचे सहकार्य केले. कार्यक्रमाला प्रविणा यादव, पोलीस निरीक्षक, मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक, बेगमपुरा गोपाल देवहाडे, आर.एम.ओ घाटि, प्रा.शरद सोनवणे, डॉ.सचीन साबळे, महादेव डांबरे, देविदास पंडित, विजय निबाळकर,
कार्तिक वाघ, राम पंडित,
आयोध्या पुरी, सौ.पूजा पंडित,
लक्ष्मी पंडित यांच्यासह माणुसकी समूहाचे अनेक सदस्य उपस्थित होते.
संवादातून जाणून घेतलेल्या रुग्णांच्या समस्या...
प्रविणा यादव,पोलीस निरीक्षक, वेदांतनगर यांनी या प्रसंगी महिला रुग्णांशी संवाद साधला व त्यांना धीर देत लवकर बरे होण्यासाठी आधार दिला याप्रसंगी बोलताना सांगितले,
"आजच्या समाजात जेव्हा माणुसकी हरवत चालली आहे, तेव्हा रुग्णांसाठी राखी साजरी करणं हा एक अत्यंत हृदयस्पर्शी उपक्रम आहे. सुमित पंडित व त्यांच्या माणुसकी टीमचे मनापासून अभिनंदन. मला स्वतःला या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने हे माझं भाग्य आहे. रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हेच खरं समाजकार्य आहे."
--------प्रविणा यादव, पोलीस निरीक्षक, वेदांतनगर
माणुसकी समुहाच्या कार्यामुळे हजारो गरजुं रुग्णाना मदत मिळते
सुमित सारखे काही घटक समाजात माणुसकी जपण्याचे कार्य करतात त्यामुळे कितीतरी गरजुंपर्यंत मदत पोहचते आज
"या राखीच्या सणाला माणुसकीच्या धाग्यांनी जोडलेलं बंधन पाहिलं आणि मन भारावून गेलं. या समाजात अजूनही अशी माणसं आहेत जी निस्वार्थ सेवा करत आहेत. अशा समाजसेवकांच्या कार्यामुळे रुग्णांना आधार मिळतो आणि आमचा समाज अधिक संवेदनशील बनतो."
-----मंगेश जगताप,पोलीस निरीक्षक, बेगमपुरा
What's Your Reaction?






