श्री. मुर्डेश्वर संस्थानाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा- मंत्री अब्दुल सत्तार

 0
श्री. मुर्डेश्वर संस्थानाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा- मंत्री अब्दुल सत्तार

श्री. मुर्डेश्वर संस्थानाचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा- अब्दुल सत्तार 

         

 औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज)- श्री. मुर्डेश्वर संस्थानाचे महत्व समोर ठेवून भाविकांना मूलभूत पायाभूत सुविधांसह येथे पर्यटन वृद्धी व विकासाचे नवे रूप देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने संयुक्तपणे काम करून लोकाभिमुख विकास आराखडा तयार करावा असे निर्देश पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

तसेच येथे वन विभागाच्या जागेचा प्रश्न निकाली काढून वन विभागाने येथे वन पर्यटन बाबत शासनास प्रस्ताव सादर करावा, असंही त्यांनी सांगितले.

श्री. मुर्डेश्वर संस्थान येथे सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी अब्दुल सत्तार यांनी दिली.

 औरंगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुर्डेश्वर , केळगाव येथे विकास कामांसाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्या अनुषंगाने येथे करण्यात येणाऱ्या विकास कामांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

              बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, श्री. मुर्डेश्वर संस्थांनचे महंत ओंकारगिरी महाराज, महंत विद्यानंद महाराज, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, देविदास लोखंडे, श्रीरंग साळवे, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरीकर, वारकरी शिक्षण परिषदेचे कृष्णा लहाने, केशवराव तायडे , दामूअण्णा गव्हाणे, राजेंद्र ठोंबरे, दुर्गाबाई पवार, डॉ. संजय जामकर, सतीश ताठे, नगरसेवक मनोज झंवर, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, केळगाव सरपंच अशोक वाघमोडे, उपसरपंच बबन चव्हाण, सयाजीराव वाघ, सरदार लखवाल, नानासाहेब राहटे, मुरलीधर शेजुळ, रवी काळे, अक्षय मगर, आशिष कटारिया, शेख सलीम भिकन, रवी राजपूत, केळगाव येथील बद्रीनाथ कोठाळे, संतोष जाधव, विकास मुळे, शेषराव जाधव, रोहिदास पवार, धिरसिंग पवार यांच्यासह जि.प. बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, जल संधारण, पाटबंधारे, पर्यटन विभाग यासारख्या सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

येत्या 30 दिवसांत विकास आराखडा तयार करावा. भूमिअभिलेख विभागाने मंदिर व वन विभागाच्या जागेच्या मोजमाप करून तातडीने सीमा निश्चित कराव्यात, विकास आराखडा मध्ये विद्युतीकरण, पिण्याचे पाणी, परीसरात सौंदर्याकरण, वन उद्यान तसेच इतर ठिकाणच्या तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर आवश्यक त्या कामांचा समावेश करावा असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचित केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow